महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Chandrakant Patil Criticized Congress : महाराष्ट्राची नाचक्की झाली तेव्हा उद्धवजींना माफी मागायला सांगायला हवं होत : चंद्रकांत पाटील - काँग्रेसचे नितीन गडकरींच्या घरासमोर आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात काँग्रेसतर्फे भाजप नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येत ( Congress Protest At Nitin Gadkari House ) आहे. या प्रकाराचा समाचार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतला. कोरोना काळात महाराष्ट्राची जगभरात नाचक्की झाली तेव्हा उद्धवजींना माफी मागायला सांगायला हवं होत, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसचा समाचार घेतला ( Chandrakant Patil Criticized Congress ) .

तेव्हा उद्धवजींनी माफी मागायला हवी होती! चंद्रकांत पाटील
तेव्हा उद्धवजींनी माफी मागायला हवी होती! चंद्रकांत पाटील

By

Published : Feb 10, 2022, 6:08 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये काँग्रेस पक्षावर केलेली टीका ( Narendra Modi Criticized Congress ) काँग्रेस नेत्यांच्या जिव्हारी लागल्याने आता राजकारण तापले आहे. यातच राज्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी ( Congress Protest At Nitin Gadkari House ) , तसेच पुण्यामध्ये या प्रश्नावर काँग्रेस व भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले. याबाबत प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोरोनामध्ये महाराष्ट्राची जी बदनामी झाली, याबाबत तेव्हा उद्धवजींना माफी मागायला सांगायला हवं होत, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसचा समाचार घेतला ( Chandrakant Patil Criticized Congress ) . भाजप प्रदेश कार्यालयात ते बोलत होते.

महाराष्ट्राची नाचक्की झाली तेव्हा उद्धवजींना माफी मागायला सांगायला हवं होत : चंद्रकांत पाटील

महाराष्ट्राची जगभरात नाचक्की झाली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. याप्रकरणी आता काँग्रेस नेते आक्रमक झाले असून, राज्यभर ते भाजपच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहेत. याप्रकरणी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोविडमध्ये काँग्रेस बिळात का बसली होती? आत्ता जे कार्यकर्ते बाहेर आहेत ते तेव्हा कुठे होते? महाराष्ट्रात सर्वात जास्त मृत्यू झाले. नगरसारख्या ठिकाणी एका सरणावर २४ मृतदेह जाळले गेले. एकेका ॲम्बुलन्समध्ये २०-२० मृतदेह नेण्यात आले. याबाबत महाराष्ट्राची जगभरात नाचक्की झाली. इथल्या परप्रांतीयांना हे सरकार आत्मविश्वास देऊ शकले नाही म्हणून ते त्यांच्या राज्यात पुन्हा जाऊ लागले व मोदींनी त्याबाबत ट्रेन सोडल्या. आता महाराष्ट्राची इतकी नाचक्की झाली तर, उद्धवजींनी तेव्हा माफी मागायला हवी होती, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

कोविडमध्ये केलेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढावी

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे की, कोविडमध्ये महाराष्ट्रात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तिजोरी रिकामी केली. राजेश टोपे यांच्या वक्तव्याचा चंद्रकांत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, आम्हाला तेच हवं आहे. याबाबत त्यांनी श्वेतपत्रिका काढावी. कोरोनामध्ये महाराष्ट्र शासनाने किती पैसे खर्च केले? माझ्या जनरल नॉलेजप्रमाणे हे सर्व केंद्राकडून आलं आहे. व्हॅक्सिन, इंजेक्शन, कशावर राज्य सरकारने पैसे खर्च केले व ते पैसे कोणाला दिले हे राज्याने सांगायला हवं. तुमच्या मर्जीतल्या लोकांना टेंडर देण्यासाठी तुम्ही कर्जबाजारी झालात का? तुमच्या लोकांना तुम्ही कोविड सेंटरचे टेंडर दिलं हे लोकांना माहित पडायला पाहिजे. कोविडमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची लिंक मोठी असून, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्लासुद्धा त्याच दृष्टिकोनातून झालेला आहे, असा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details