हैदराबाद -हिंदू धर्मात दिवाळी हा सण आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. लोक मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी करतात. हिंदू कॅलेंडरनुसार, दिवाळी हा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो. या दिवशी गणेशासह लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात लक्ष्मीला सुख, समृद्धी आणि संपत्तीची देवी मानले जाते. दिवाळीत देवी लक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मीजी प्रसन्न होऊन तिला सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात. या दिवशी श्रीगणेश आणि माता लक्ष्मीसोबत धनाचे देवता कुबेराचीही पूजा केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, रावणाचा वध करून भगवान राम माता सीतेसह अयोध्येत परतले. प्रभू राम परतल्यानंतर संपूर्ण अयोध्या नगरी दिव्यांनी सजली होती. दिवाळीच्या दिवशी लोक घरात दिवे लाऊन देवी लक्ष्मीची पूजा करतात. लक्ष्मीपूजन प्रामुख्याने रात्री केले जाते.
- काय आहेत लक्ष्मीपुजनाच्या वेळा -
दिवस : गुरुवार, ०४ नोव्हेंबर
सूर्योदय - 06:21 AM
सूर्यास्त- 06:07 PM
अमावस्या - सकाळी 06:03 ते 02:44 (05 नोव्हेंबर)
राहुकाल - दुपारी 01:33 ते 02:59 pm