मुंबई -राज्यातील राजकारणात सध्या अंडरवर्ल्डचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत मंत्री नवाब मलिकांनी जमिनीचे व्यवहार केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यासकट केला. त्यानंतर मलिकांनी फडणवीसांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा दावा केला. आज झालेल्या पत्रकार परिषदेत रियाज भाटी कोण? असा सवाल केला. मात्र याच रियाज भाटीची मुंबईतील खंडणी प्रकरणी मंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचला रियाज भाटी हवा आहे. रियाज भाटी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा अतिशय जवळचा व्यक्ती आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधात झालेल्या खंडणी प्रकरणातील आरोपांमध्ये मुंबई पोलिसांना रियाज भाटी हवा आहे. या वसुलीच्या आरोपांमुळेत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी संबंध जोडले जात आहेत.
खंडणी प्रकरणात भाटी याच्याविरोधात मुंबई क्राईम ब्रॅंचने गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे क्राईम ब्रॅंचकडून रियाज भाटीचा शोध घेतला जात आहे. परंतु भाटी या प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी असून सध्या तो फरार आहे. खंडणी प्रकरणी आरोपीविरोधात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. परंतु हा अर्ज मुंबई सत्र न्यायालयाकडून फेटाळण्यात आला होता. या प्रकरणात भाटीला अटक करणे महत्त्वाचं आहे. रियाज भाटी विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. बार आणि रेस्टॉरंटमधून रियाज खंडणी वसूल करण्याचे काम हे सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांच्यामार्फत करत होता. सध्या सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचच्या कस्टडीत आहे. गोरेगावच्या एका बांधकाम व्यावसायिकांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये सचिन वाझेच्या माध्यमातून परमबीर सिंग यांचे खंडणीतील कनेक्शन समोर आले आहे.
खंडणी व्हाया सचिन वाझे -
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग अद्यापही फरार असून क्राईम ब्रॅंचकडून त्यांचे शोधकार्य सुरू आहे. पोलिसांकडून त्यांना अनेक नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. अनेक तपास यंत्रणांकडूनही त्यांचा शोध घेतला जात आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग भारताबाहेर फरार झाल्याचे समजलं जात आहे. परमबीर सिंग यांना भारताबाहेर पळून जाण्यासाठी भाजपने मदत केल्याचे आरोपही करण्यात आले आहेत. दरम्यान, राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. रियाज भाटी कोण आहे? असा सवाल मलिकांनी फडणवीसांना विचारला आहे. फडणवीस यांच्यासोबत आणि भाजपाच्या कार्यक्रमात रियाज भाटी अनेक कार्यक्रमात दिसला होता? असा सवालही नवाब मलिक यांनी केला असून फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
हे ही वाचा -रियाज भाटी हा पंतप्रधानांच्या कार्यक्रमांमध्ये कसा पोहोचला? नवाब मलिकांचा सवाल
मुंबईतील 'या' प्रकरणात परमबीर सिंग, सचिन वाझे अन् रियाज भाटीचे कनेक्शन काय?
खंडणी प्रकरणात भाटी याच्याविरोधात मुंबई क्राईम ब्रॅंचने गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे क्राईम ब्रॅंचकडून रियाज भाटीचा शोध घेतला जात आहे. परंतु भाटी या प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी असून सध्या तो फरार आहे. खंडणी प्रकरणी आरोपीविरोधात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.
कोण आहे रियाज भाटी?
अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध असलेला रियाज भाटी हा गँगस्टर छोटा शकिलचा अत्यंत खास व्यक्ती आहे. २००६ मध्ये कमी दरात जागा मिळवण्यासाठी त्याने शकीलची मोठी मदत केली होती. हे प्रकरण बाहेर येताच रियाजवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच २०१० मध्ये अंधेरीमध्ये जमिनीच्या विकासातून उद्भवलेल्या वादातून भाटी आणि त्याच्या साथीदाराने एका विकासकाला बंदुकीचा धाक दाखवत धमकावले होते. त्यावेळी पुन्हा एकदा भाटीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच भाटीचे गुन्हेगार संबंध वाढत गेल्यानंतर तो छोटा राजनसाठी काम करायचा. त्यामुळे विविध प्रकारच्या गुन्हांची नोंद ही भाटीवर करण्यात आली आहे.
काय म्हणाले नवाब मलिक?
रियाज भाटी कोण आहे? २९ ऑक्टोबरला तो बनावट पासपोर्टमुळे सहारा विमानतळावर पकडला गेला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत त्याचे संबंध असल्याच्या बातम्या आल्या. दोन पासपोर्टसोबत पकडला जाऊनही तो दोन दिवसांत सुटला. तो भाजपाच्या तुमच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये का दिसत होता? तुमच्या डिनर टेबलवर का दिसत होता. पंतप्रधान आले असताना रियाज भाटीने त्यांच्यासोबतही फोटो काढले. तुमच्या आशीर्वादाने हा सगळा खेळ चालत होता असा गंभीर आरोप नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.