मुंबई:पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांना ईडी कडून तीन वेळा समनबजावण्यात आले होते त्यापैकी एक वेळा संजय राऊत यांनी कार्यालयात जाऊन चौकशीला समोर गेले होते त्यानंतर त्यांना पुन्हा समन्स आल्याने ते चौकशीला जाऊ शकले नव्हते. संजय राऊत यांनी ईडीला आठ ऑगस्टपर्यंत वेळ मागितली होती मात्र डीडीने वेळ न देता 31 जुलै च्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास राऊत यांच्या घरी छापेमारी साठी दाखल झाले होते
पत्राचाळ प्रकरणी कारवाईराऊत यांच्या विरोधात पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे ईडीने आतापर्यंत अलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील घर जप्त केले आहे. ही कारवाई काही दिवसांआधी करण्यात आली होती एकूण 11 कोटी 15 लाख 56 हजार 573 रुपयांची स्थावर मालमत्ता ईडीने जप्त केलेली आहे राऊत यांचे अलिबागमधील 8 प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई झाली आहे मात्र जप्तीबद्दल कोणतीही नेमकी ठोस माहिती पुढे आली नाही
भाऊ प्रविण राऊत यांनाही अटक मुंबईतील 1 हजार 39 कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे
वर्षा राऊत स्वप्ना पाटकर यांची एकत्रित मालकी ईडीने यापूर्वी 11 कोटी 15 लाख 56 हजार 573 रुपयांची स्थावर मालमत्ता या प्रकरणामध्ये अटॅच केली असून मनी लॉण्ड्रींग कायदा 2022 अंतर्गत गोरेगावमधील पत्रावाला चाळ पुर्निविकास प्रकल्पामध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सने केलेल्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आलीय ही संपत्ती मे गुरू आशीष कन्स्ट्रक्शन्सचे माजी निर्देशक प्रवीण राऊत यांच्या मालकीची पालघर सफाळे पडघा येथील जमीनींबरोबरच दादरमधील वर्षा राऊत यांचा फ्लॅट आणि अलिबाग मधील किहिम समुद्रकिनाऱ्यावरील वर्षा राऊत तसेच स्वप्ना पाटकर ज्या सुजित पाटकर यांच्या पत्नी आहेत या दोघींची एकत्रित मालकी असणाऱ्या जमीनीचा समावेश आहे
काय आहे पत्राचाळ घोटाळापत्रा चाळ परिसरातील बैठ्या घरांमध्ये राहात असलेल्या 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008 मध्ये मे गुरू आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली ही घरे भाडेतत्त्वावर असल्यामुळे त्यासाठी म्हाडाची परवानगी आवश्यक होती म्हाडानेही त्यास तयारी दाखवत विकासक आणि सोसायटीसमवेत करारनामा केला याअंतर्गत मूळ रहिवाशांचे मोफत पुनर्वसन केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या बांधकामामध्ये विकासक आणि म्हाडामध्ये समान हिस्सा राहणार होता मात्र म्हाडा अधिकाऱ्यांनी जमिनीची मोजणी कमी केल्यामुळे विकासकाला 414 कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा आक्षेप निवासी लेखापरीक्षण विभागाने घेतला
म्हाडावर जोरदार ताशेरे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी म्हाडावर जोरदार ताशेरे ओढले त्यानंतर त्यास जबाबदार असलेल्या कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करण्यात आले एका महिन्याच्या नोटिशीची मुदत संपल्यावर विकासकाची उचलबांगडी करण्यात आली मात्र विकासकाला पुनर्वसनातील सदनिका बांधण्याआधीच विक्रीची परवानगी देणाऱ्या तत्कालीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यावर काहीही कारवाई केली नाही मात्र त्याचा फटका सामान्य रहिवाशांना बसला आहे गेली पाच वर्षे भाडे नाही आणि हक्काचे घरही गमावावे लागले आहे
आक्षेप असणारा जमीन व्यवहार काय पत्रा चाळ परिसराचे मूळ क्षेत्रफळ 193599 चौरस मीटर विकास करारनाम्यात 165805 चौरस मीटर म्हणजे 27794 चौरस मीटर कमी दाखविण्यात आले म्हाडाच्या वाटय़ाला येणाऱ्या 50 टक्के म्हणजे 13 897 चौरस मीटर जागेचा विकासकाला फायदा करून दिल्याप्रकरणी कार्यकारी अभियंता एस डी महाजन निलंबित झालेले आहेत मे गुरू आशीष कन्स्ट्रक्शनने युनियन बँक ऑफ इंडिया कडून कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेने विकासकाविरुद्ध लवादाकडे दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करण्याबाबत अर्ज केला त्यानुसार राष्ट्रीय कंपनी विधी लवादाने विकासकाला म्हणजेच या कंपनीला दिवाळखोर घोषित केले
एफसआय विकत कमवले 901 कोटीमे गुरू आशीष कन्स्ट्रक्शन्स'च्या नावाखाली हा सर्व घोटाळा झाला तेव्हा राजेश कुमार वाधवान सारंग वाधवा आणि प्रवीण राऊत हे या कंपनीचे निर्देश होते ही कंपनी आणि म्हाडादरम्यान झालेल्या करारामनुसार येथील 672 कुटुंबांना पुन:विकसित केलेले प्लॅट्स म्हाडाच्या माध्यमातून बांधून देणे अपेक्षित होते त्यानंतर उर्वरित जमीन ही विकासांना विकली जाणार होती मे गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स च्या निर्देशकांनी म्हाडाची फसवणूक केली त्यांनी या जागेचा एफएसआय 9 विकासकांना विकला यामधून त्यांनी अंदाज 901 कोटी 79 लाखांचा निधी मिळवला मात्र त्यांनी म्हाडासाठी 672 घरांचा बांधकाम केलं नाही