महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

देशात चर्चा ! हे 'मरकझ' आणि 'तबलिगी जमात' म्हणजे नेमकं काय? - delhi nizamuddin markaz

विसाव्या शतकात 'तबलिगी जमात' हे इस्लाम धर्माचे एक महत्त्वाचे आंदोलन मानले जात होते. हे आंदोलन १९२७ मध्ये मोहम्मद इलियास अल-कांधलवी यांनी भारतात सुरू केले. हरियाणाच्या नूंह जिल्ह्यातील एका गावातून याची सुरुवात करण्यात आली होती...

delhi nizamuddin markaz tablighi jamaat
मरकझ

By

Published : Apr 1, 2020, 3:21 PM IST

Updated : Apr 1, 2020, 3:29 PM IST

मुंबई -कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून विविध पावले उचलली जात आहेत. त्यातच सोमवारी तेलंगणा राज्यातील 6 कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूच्या बातमीने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. याचे कारण हे सर्व कोरोनाग्रस्त रुग्ण काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या निजामुद्दीन येथे 'मरकझ तबलिगी जमात' या एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन घरी परतले होते. या नागरिकांच्या मृत्यूनंतर आता 'मरकझ' आणि 'तबलिगी जमात' हे शब्द चर्चेत आले आहेत. तर पाहुयात हे 'मरकझ' आणि 'तबलिगी जमात' म्हणजे नेमके काय आहे.

मरकझ तबलिगी जमात

तबलिगी जमात आणि मरकज

काही दिवसांपुर्वीच दिल्लीच्या निझामुद्दीन येथे 'मरकझ तबलिगी जमात' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यातील मरकझ, तबलिगी आणि जमात या शब्दांचा अर्थ वेगवेगळा आहे. तबलिगी याचा अर्थ अल्लाहाच्या संदेशाचा प्रसार करणे. जमात या शब्दाचा अर्थ समूह असा होता. तर मरकझ याचा अर्थ बैठकीसाठीची एक जागा. तबलिगी जमातशी संबंधित लोक पारंपारिक इस्लामला मानतात आणि याचा प्रचार-प्रसार करतात. त्याचेच मुख्यालय दिल्लीतील निझामुद्दीन येथे आहे.

निझामुद्दीन मरकझ तबलिगी जमात

हेही वाचा...निजामुद्दीन येथील 'मरकज'ला उपस्थित राहिलेल्या 5 जणांचे क्वारंटाईन

कशी झाली सुरुवात

मुस्लीम धर्म टिकवून ठेवण्यासाठी आणि इस्लामचा प्रसार व माहिती देण्यासाठी 'तबलिगी जमात' सुरू केली. विसाव्या शतकात 'तबलिगी जमात' हे इस्लाम धर्माचे एक महत्त्वाचे आंदोलन मानले जात होते. हे आंदोलन १९२७ मध्ये मोहम्मद इलियास अल-कांधलवी यांनी भारतात सुरू केले. हरियाणाच्या नूंह जिल्ह्यातील एका गावातून याची सुरुवात करण्यात आली होती. या जमातची सहा मुख्य उद्दिष्टे सांगितली आहेत. ज्याला 'छह उसूल' म्हटले जाते. कलिमा, सलात, इल्म, इक्राम-ए-मुस्लिम, इख्लास-ए-निय्यत, दावत-ओ-तबलीग अशी ती सहा उसूल आहेत. या तबलिगी जमातचे कार्य आज जगातील सुमारे 213 देशांमध्ये पसरले आहे.

मरकझ तबलिगी जमात

कसा केला जातो धर्माचा प्रसार ?

'मरकझ'मधून वेगवेगळ्या भागात 'तबलिगी जमात' प्रसारासाठी बाहेर निघतात. यामध्ये कमीत कमी ३ दिवस, ५ दिवस, १० दिवस, ४० दिवस आणि चार महिन्यांपर्यंत या जमाती बाहेर गावी दौऱ्यावर जातात. एका जमातीत ८ ते १० लोकांचा समावेश असतो. यातील २ जण इतरांच्या सेवेचे आणि त्यांच्यासाठी जेवण बनवण्याचे काम करतात. जमातीतील लोक सकाळी-सायंकाळी शहरभर फिरून लोकांना मशिदीत येण्यासाठी बोलावतात. सकाळी १० वाजता हदीस पढली जाते. नमाज पढण्यावर आणि रोजा पाळण्यावर त्यांचा भर असतो. या पद्धतीने ते इस्लामचा प्रसार करतात.

हेही वाचा...दिल्लीच्या मरकझमधून दहाजण अकोल्यात दाखल, शोध सुरू

दिल्लीतील निझामुद्दीन येथील मरकझ

दिल्लीतील निझामुद्दीन भागातील इमारत तबलिगी जमातीची इमारत मुख्यालय म्हणून ओळखली जाते. तबलिगी जमातीशी संबंधित लोक जे इस्लाम धर्माचा प्रचार आणि प्रसार करतात. त्यांचे १०, २०, ३० किंवा त्याहून अधिक संख्या असलेले गट निझामुद्दीनमध्ये येतात. त्यानंतर येथून हे गट देशाच्या अथवा जगातील विविध भागांमध्ये जातात. तबलिगी जमातीशी संबंधित दिल्ली आणि आसपासचे लोक येथे येत असतात. दर जुमेरातीला येथे बैठकांचे आयोजन होते. यात, एकत्र बसून हे लोक धर्मावर चर्चा करतात. महिन्यातून एकदा येथे मोठी बैठक पार पडते. या मासिक बैठकीला सुमारे २ ते ३ हजार लोक उपस्थित असतात.

निझामुद्दीन मरकझ तबलिगी जमात

निजामुद्दीन येथील मरकझ आणि कोरोनाचा प्रसार

निजामुद्दीन भागातील तबलीग-ए-जमातच्या मरकझ मध्ये 15 ते 18 मार्च या कालावधीत मलेशिया, इंडोनेशिया, सौदी अरेबिया आणि किर्गिझस्तान यांच्यासह 2,000 हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. या मरकझमध्ये देशातील अनेक भागातील काही मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. याच मरकझमध्ये तेलंगणा राज्यातील सहभागी झालेल्या काही मुस्लीम बांधवांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे आता सध्या या कार्यक्रामातील सहभागी लोकांचा शोध घेतला जात आहे.

Last Updated : Apr 1, 2020, 3:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details