मुंबई -गेले दोन वर्षे कोरोना चाचण्या हा शब्द प्रत्येकाने ऐकला आहे. मात्र आता कोरोनाचे जस जसे नवीन व्हेरियंट समोर येत आहेत. तस तसे चाचण्यांच्या बाबतीतही नवीन शब्द लोकांच्या कानावर पडू लागले आहेत. कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर यावी यासाठी आरटीपीसीआर ( रिवर्स ट्रांसक्रिप्शन पॉलीमर्स चेन रिएक्शन (Reverse Transcription Polymerase Chain Reaction) ) तसेच अँटीजेन चाचण्या केल्या जातात. तर रुग्णाला नेमक्या कोणत्या प्रकारच्या कोरोना विषाणूच्या प्रकारची लागण झाली आहे. हे जीनोम सिक्वेंसिंग चाचण्यांमधून ( Genome Sequencing Test ) समोर येते.
कोरोना चाचण्या -
देशभरात गेली पावणे दोन वर्ष कोरोना विषाणूचा प्रसार सुरू आहे. हा प्रसार सुरु होण्याआधीपासून परदेशातून आलेले आणि त्यांच्या सहवासात आलेल्या नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे का? हे तपासण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्या करण्यास सुरुवात केली. आरटीपीसीआर चाचण्यांचे नमुने सुरुवातीला पुण्याच्या एनआयव्ही या प्रयोगशाळेकडे पाठवले जात होते. देशभरातून या प्रयोग शाळेकडे नमुने येत असल्याने सुरुवातीला तीन ते चार दिवसांनी अहवाल येत होता. पुढे हा कालावधी कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने कस्तुरबा रुग्णालयात तसेच आपल्या काही रुग्णालयात चाचण्यांसाठी लागणारी यंत्र मागवून चाचणी केंद्र सुरु केली आहेत. यामुळे मुंबईमध्ये अहवाल काही ठिकाणी काही तासात तर काही ठिकाणी एका दिवसात मिळू लागला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांचा अहवाल यायला वेळ लागत असल्याने अँटीजेन चाचण्या केल्या जात आहेत. या चाचण्यांचा अहवाल अवघ्या १५ मिनिटात येतो.
पुण्यात जीनोम सिक्वेंसिंग चाचण्या -
भारतात गेले पावणे दोन वर्ष कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार सुरु असतानाच या विषाणूने आपल्यात अनेकवेळा बदल घडवून आणले आहेत. विषाणूमध्ये होणाऱ्या बदलाची माहिती पुण्याच्या एनआयव्ही या संस्थेमधील चाचण्यांमधून समोर येत होती. या प्रयोगशाळेत मुंबईमधून आठवड्याला ५० सॅम्पल पाठवले जात होते. पुण्याच्या प्रयोगशाळेमध्ये देशभरातून सॅम्पल येत असल्याने अहवाल यायला उशीर लागत होता. दीड ते दोन महिन्याच्या कालावधीने अहवाल येत असल्याने तो पर्यंत रुग्ण बरा झाला असायचा किंवा त्याचा मृत्यू झाला असलायचा. तसेच विषाणूचा प्रसार किती प्रमाणात झाला याची माहिती मिळण्यास उशीर होत होता. यामुळे वेळीच उपचार करणे शक्य नव्हते.
कस्तुरबा रुग्णालयात लॅब -