महाराष्ट्र

maharashtra

Pitru Paksha 2022 श्राद्धात कावळा का महत्त्वाचा ? आपले पूर्वज कावळ्याच्या स्वरूपात अन्न खायला येतात का?

By

Published : Sep 5, 2022, 5:28 PM IST

हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, पितृपक्षात काळात आत्म्याच्या शांतीसाठी, पितरांना खाऊ घातले जाते. पितृ पक्षाला कावळ्याचे विशेष महत्त्व Crow Important In Pitru Paksha आहे. कावळा हा यमाचे प्रतीक मानले जाते. पितृ पक्षाच्या काळात घराच्या अंगणात कावळा येऊन बसला असेल. तसेच दिलेले धान्य हे कावळ्याने खाल्ल्यास our ancestors come to eat food, आपले पुर्वज येऊन आपल्याला आर्शिवाद in the form of crows देऊन गेले, असे म्हणतात. Pitru Paksha 2022

Pitru Paksha 2022
श्राद्धात कावळा का महत्त्वाचा

मुंबईयंदा पितृ पक्ष १० सप्टेंबरपासून सुरू होत आहे. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, पितृसत्ताक काळात आत्म्याच्या शांतीसाठी, पितरांना खाऊ घातले जाते. पितृ पक्षाला कावळ्याचे विशेष महत्त्व Crow Important In Pitru Paksha आहे. कावळा हा यमाचे प्रतीक मानले जाते. श्राद्ध पक्षात आपण आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी कावळ्याला अन्न देत असतो. पितृ पक्षाच्या काळात घराच्या अंगणात कावळा येऊन बसला असेल, तर ते शुभ मानले जाते. तसेच दिलेले धान्य हे कावळ्याने खाल्ल्यास our ancestors come to eat food, आपले पुर्वज येऊन आपल्याला आर्शिवाद in the form of crows देऊन गेले, असे म्हणतात. Pitru Paksha 2022

कावळा हे यमराजाचे प्रतीकशास्त्रानुसार कावळा हा यमराजाचा दूत मानला जातो. हिंदू धर्मात कावळ्याला अधिक महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार, कावळे नैसर्गिकरित्या मरत नाहीत. कावळा रोगाने व म्हातारपणाने मरत नाही. त्यांचा मृत्यू अपघाती आहे. असे म्हणतात की, कावळा मेला की, त्याचे बाकीचे साथीदार त्या दिवशी अन्न खात नाहीत. प्राचीन शास्त्रानुसार यमाने कावळ्याला वरदान दिले होते की, तुला दिलेले अन्न पूर्वजांच्या आत्म्यांना शांती देईल. तेव्हापासून ही प्रथा चालू आहे. शास्त्रानुसार, श्राद्ध केल्यावर ब्राह्मणाला जेवण देणे जेवढे आवश्यक आहे, तेवढेच कावळ्याला खायला देणे देखील आवश्यक आहे. असे मानले जाते की, कावळे आपल्या पूर्वजांचे रूप धारण करतात आणि या काळात आपल्यासोबत उपस्थित राहतात.


कोणत्याही पक्ष्याला अन्न दिले जाऊ शकतेपितृ पक्षात कावळे, कुत्रे आणि गायींचे असे एक-एक जेवनाचे पान वाढतात. जर कावळे उपलब्ध नसतील तर, कोणत्याही पक्ष्याला खायला दिले जाऊ शकते. परंतु कावळ्यांना खाऊ घालणे कधीही चांगले. गरुड पुराणात लिहिले आहे की, कावळा हा यमराजाचा दूत आहे. श्राद्ध पक्षात कावळ्यांना खायला घातल्याने, यमलोकातील पितरांना समाधान मिळते.

शास्त्रानुसार, श्राद्ध केल्यावर ब्राह्मणाला जेवण देणे जेवढे आवश्यक आहे, तेवढेच कावळ्याला खायला देणे देखील आवश्यक आहे. असे मानले जाते की, कावळे आपल्या पूर्वजांचे रूप धारण करतात आणि या काळात आपल्यासोबत उपस्थित राहतात. बदलत्या काळात होत असलेल्या औद्योगिकीकरणाचा परिणाम पितृपक्षातही दिसून येतो.

पितृ पक्षात कावळे न मिळाल्यामुळे, अपूर्ण राहिली पौराणिक श्रद्धापितृ पक्ष सुरू झाला की, लोक आपल्या पूर्वजांचे श्राद्ध आणि तर्पण करायला सुरुवात करतात. यावेळी, कावळ्याचे आगमन आणि अन्न घेणे, हे एक शुभ प्रतीक मानले जाते. परंतु अनेक ठिकाणी आता कावळेही क्वचितच दिसतात. अशा स्थितीत असे म्हणता येईल की, श्रद्धेच्या या सणात आता पर्यावरणाचा परिणाम दिसून येत आहे. एक दशकापूर्वी, जेव्हा एक कावळा सकाळी घराच्या दारावर येऊन काव काव करत असे, तेव्हा असे मानले जात होते की घरात पाहुणे येणार आहेत. त्याचबरोबर पितृपक्षात कावळ्याचे महत्त्व अचानक वाढते, कारण असे मानले जाते की कावळ्याला अन्न दिल्याशिवाय पूर्वजांचे समाधान होत नाही.


कावळे हे नैसर्गिक सफाई कर्मचारीवाढती लोकसंख्या आणि शहरात झाडांची संख्या कमी झाल्यामुळे, इतर पक्ष्यांसह कावळे आता दिसत नाहीत. कारखान्यांचा परिसर आणि वसाहतींमध्ये फक्त एक किंवा दोन झाडे दिसतात, ती देखील मोठ्या अंतरावर आहेत. तर कावळे दाट झाडांमध्ये राहणे पसंत करतात. कारण ते मोठ्या संख्येने एकत्र राहतात. त्याचबरोबर वाहनांच्या आवाजामुळे शहरात त्यांची संख्या कमी होताना दिसते. कावळे हे परिसंस्थेचा भाग आहेत. त्यांच्याशिवाय निसर्गाचा समतोल बिघडू शकतो. कावळे नैसर्गिकरीत्या सफाई कर्मचारी आहेत. ते लहान कीटक तसेच प्रदूषण करणारे घटक खातात. यामुळे नैसर्गिक कचरा व्यवस्थापन होते. कावळ्याशिवाय प्रदूषणाची समस्या आणखी वाढेल. याशिवाय ते पिकांचे आणि झाडांचे कीटक खाऊन पिकाचे संरक्षणही करतात.

पितृ पक्षाच्या काळात लोक त्यांच्या पूर्वजांसाठी श्राद्ध करतील. दिवंगत आत्म्यांच्या शांतीसाठी विधी केले जातील. अशा स्थितीत यज्ञ केल्यानंतर लोक कावळ्याद्वारे आपल्या पूर्वजांना पाणी आणि अन्न अर्पण करतात. असे म्हणतात की, पूर्वजांचा आत्मा या कावळ्यांमध्ये राहतो. परंतु देशात कावळ्यांची संख्या कमी झाल्यामुळे पूर्वजांना पाणी आणि अन्न अर्पण करण्यात अडथळा येत आहे. Pitru Paksha 2022

हेही वाचाShardiya Navratri 2022: कधीपासून सुरू होतेय शारदीय नवरात्री?, जाणून घ्या घटस्थापनेची वेळ अन् मुहूर्त

ABOUT THE AUTHOR

...view details