मुंबई -राज्यात असलेल्या चार प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी दिल्लीत वाढत आहेत. या भेटींमधून महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या तिन्ही पक्ष एकमेकांना संदेश देण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून मांडण्यात येत आहे.
दिल्लीत राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्यामुळे राज्यातील राजकारणाच्या हालचालींना मोठा वेग आला आहे. गेल्या आठवडाभरापासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी दिल्लीत होत असल्याने नेमकं राज्याच्या राजकारणात काय सुरू आहे? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. दिल्लीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट झाली. या भेटी आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज दिल्लीत गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे आमदार आशिष शेलार यांची गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तत्काळ दिल्लीसाठी रवाना होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळते. राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना समोर ठेवून या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
हेही वाचा -शरद पवारांसोबत गुप्तगू सुरु असतानाच रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींची घेतली भेट
- दिल्लीत शरद पवार आणि अमित शाह यांची भेट -
शरद पवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन 3 ऑगस्ट रोजी भेट घेतली होती. अमित शाह यांच्याकडे नव्याने तयार करण्यात आलेले सहकार खातं आहे. या सहकार खात्या संबंधित चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, या भेटीदरम्यान इतर राजकीय चर्चाही झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत होतं. तसेच ही भेट झाल्यानंतर शरद पवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पुण्यात येण्याचे आमंत्रणही दिलं आहे. सहकार मंत्री म्हणून अमित शाह यांनी पुण्यातील शुगर इन्स्टिट्यूटला भेट द्यावी असं आमंत्रण शरद पवार यांनी अमित शाह यांना दिलं. या गाठी भेटीतून भाजप आणि शरद पवार यांच्यात असलेल्या संबंधाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. भविष्याचा विचार करून शरद पवार यांनी भाजपसोबत जवळीक कायम ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे मत राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांनी व्यक्त केले आहे.
- संजय राऊत आणि राहुल गांधी यांची चर्चा -