मुंबई- दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन आज पार पडले. हे दोन्ही दिवस वादळी होते. काल विधानसभेत स्वप्निल लोणकर आत्महत्या प्रकरण, ओबीसींच्या राजकीय आरक्षणासह मराठा आरक्षणा संबंधिचा ठराव, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये झालेली खडाजंगी आणि भाजपा आमदारांच्या असभ्य वर्तवणुकीमुळे झालेले निलंबन यासह विविध मुद्यांनी गाजला, तर आज भाजपाने भरवलेले प्रतिसभागृह आणि त्यावरून झालेली वादळी चर्चा यामुळे गाजला. यासह आज नाना पटोलेंनी केलेला फोन टॅपिंगचा आरोप आणि रवी राणांनी राजदंड पळवण्याचा केलेला प्रयत्नही चर्चेत होता.
स्वप्निल लोणकर आत्महत्या प्रकरणाचे पडसाद विधानसभेत -
स्वप्निल लोणकर नावाच्या विद्यार्थ्यांने एमपीएससीची परीक्षा होत नसल्याने नैराश्येतून आत्महत्या केली होती. त्याचे पडसाद विधानसभेत उमटले. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झालेले दिसले. यावेळी एमपीएसीची कार्यप्रणाली सुधारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत सरकार या संदर्भात काही कारवाई करणार का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
ओबीसी आरक्षणाच्या ठरावावरून सभागृहात गदारोळ -
ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याचे पडसादही विधानसभेत उमटले. यावेळी राज्यातील विरोधक आणि सत्ताधाऱ्यामंध्ये आरोप-प्रत्यारोप बघायला मिळाले. यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी इंपेरिकट डाटावरून राज्य सरकारला धारेवर धरले. तर ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचेही ते म्हणाले. तर फडणवीसांच्या आरोपाला प्रत्यूत्तर देतांना छगन भुजबळ यांनी इंपेरिकट डाटा केंद्र सरकारकडे असून ते राज्य सरकारला देत नसल्याचे म्हटले. तसेच हा डाटा केंद्र सरकारतर्फे विविध योजनेसाठी वापरण्यात येतो. तर ओबीसी आरक्षणासाठी का देता येत नाही, असा प्रतिप्रश्नही भुजबळांनी उपस्थित केला.
ओबीसी आणि मराठा आऱक्षणासंदर्भातील ठराव मंजूर -
मराठा समाजाला एसईबीसीतून आरक्षण देण्याबाबतचा अडसर दूर करण्यासाठी केंद्र सरकारने संविधानात यथोचित सुधारणा करून आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करण्याबाबतचा ठराव विधानसभा व विधानपरिषदेत मंजूर करण्यात आला. तसेच ओबीसींच्या राजकीय आऱक्षणासाठी इंपेरिकल डाटा आवश्यक आहे. हा डाटा मागासवर्गीय आयोगाकडून तयार केला जातो. त्यासाठी लागणारा ओबीसी प्रवर्गाचा डाटा केंद्र सरकारने उपलब्ध करून द्यावा, यासाठीचा ठरावही यावेळी मंजूर करण्यात आला.
अध्यक्षांना धक्काबुक्की; 12 आमदरांचे निलंबन -
तालिका अध्यक्ष भास्कर जाधव हे केबिनमध्ये बसल असताना भाजपा आमदारांनी येऊन त्यांनी धक्काबुक्की केली. तसेच त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपा आमदारांनी भास्कर जाधवांशी केलेल्या गैरवर्तवणुकीमुळे भाजपाच्या 12 आमदरांवर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांचे निलंबन करण्यात आले.
भाजपाचा प्रतिसभागृह भरवण्याचा प्रयत्न; सत्ताधाऱ्यांचा आक्षेप -