महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bhai Jagtap : विरोधी पक्षातील नेत्यांविरोधात तपास यंत्रणांची कारवाई का?, भाई जगतापांचा सवाल - Congress Leader Bhai Jagtap

केंद्र सरकारच्या विरोधातील पक्षातील नेत्यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणाची कारवाई का करण्यात येते, असा प्रश्न मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप ( Congress Leader Bhai Jagtap ) यांनी उपस्थित केला आहे.

Bhai Jagtap
Bhai Jagtap

By

Published : Mar 27, 2022, 8:03 PM IST

मुंबई - मुंबई स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव ( Standing Committee Chairman Yashwant Jadhav ) यांच्याविरोधात आयकर विभागाकडे काही पुरावे असतील तर त्यांनी कारवाई करायलाच पाहिजे. मात्र, केंद्र सरकारच्या विरोधातील नेत्यांच्या विरोधातच केंद्रीय तपास यंत्रणाची कारवाई का सुरु आहे, असा प्रश्न मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप ( Congress Leader Bhai Jagtap ) यांनी उपस्थित केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना भाई जगताप म्हणाले की, मनपा स्थायी समिती यशवंत जाधव यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. जर कोणाच्या विरोधात काही पुरावे असतील तर तपास यंत्रणांनी चौकशी करावी. पण, फक्त विरोधक जे आहेत विरोधी पक्षात जे आहेत त्यांच्यावर कारवाई करावी. इतरांवर कारवाई होऊ नये हे योग्य नाही.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाई जगताप

विद्यमान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात दोन हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे कागदपत्रे आम्ही दिले आहे. परंतु, अद्याप केंद्रीय तपास यंत्रणेने साधी नोटीस देखील पाठवलेली नाही आहे. यावरून सिद्ध होते की केंद्रीय तपास यंत्रणा केवळ विरोधी पक्षातील नेत्यांविरोधात काम करत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे अनेक आरोप सभागृहामध्ये केले होते. मात्र, त्यानंतर दरेकर यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावरील सर्व आरोप धुतले गेले का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना भाई जगताप यांनी विचारला आहे.

मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना सुद्धा आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. त्यासंदर्भात बोलताना भाई जगताप यांनी सांगितले की, हे नवीन नाही. यापूर्वीही अनेक अधिकाऱ्यांना नोटिस किंवा चौकशी झाली आहे. पण, भ्रष्टाचारा संदर्भात जर कोणा विरोधात पुरावे असतील तर चौकशी करावी. मुद्दाम काही निवडक लोकांच्या विरोधात कारवाई करणे हे योग्य नाही, असेही भाई जगताप यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा -Raju Shetti : महाविकास आघाडीच्या विरोधात माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक.. म्हणाले, 'आता चिरफाड करणार..'

ABOUT THE AUTHOR

...view details