मुंबई -कोरोनामुळे रेल्वे गाड्यातील ऑनबोर्ड कॅटरिंग सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच पश्चिम रेल्वेने काही गाड्यांमध्ये तयार जेवणासह ऑनबोर्ड कॅटरिंग ( Meal on Board ) सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना तब्बल दीड वर्षांनंतर धावत रेल्वे गाड्यात जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे.
26 एक्सप्रेसमध्ये मिळणार लवकरच होणार सुरू -
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने लांब पल्याच्या गाडीच्या प्रवाशांना पुन्हा गाड्यांमध्ये तयार होणाऱ्या जेवणासह ऑनबोर्ड कॅटरिंग सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना स्वःताच जेवणाची व्यवस्था करावी लागत होती. मागील महिन्यापासून काेराेनाच्या रुग्णांची संख्या घटल्याने रेल्वेने आपली वाहतूक पुर्वपदावर आणण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार पश्चिम रेल्वेच्या काही गाड्यांमध्ये तयार जेवणासह ऑनबोर्ड कॅटरिंग सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या पॅन्ट्री सेवा असलेल्या 30 गाड्यांपैकी चार गाड्यांमध्ये जेवणाची व्यवस्था केली आहे. तर, उर्वरित 26 एक्सप्रेसमध्ये आयआरसीटीसीच्या सुचनेनुसार लवकरच ही सुविधा सुरू केली जाणार आहे.