मुंबई -जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमाना घातले आहे. कोरोना विषाणूविरोधात डॉक्टर, नर्सेस, पोलीस, स्वच्छता कर्मचारी आणि मीडिया आघाडीवर राहून लढाई लढत आहेत. आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची सेवा करणाऱ्या या कोविड योद्ध्यांची भित्तिचित्रे काढून पश्चिम रेल्वेने अनोख्या पद्धतीनं सलामी दिली आहे.
माहीम स्थानकाची भिंत जीर्ण अवस्थेत होती. त्यामुळे सुरुवातीला त्याची दुरुस्त करण्यात आली. नंतर पेंटिंगच्या माध्यमातून सौंदर्य वाढविण्यात आले. पश्चिम रेल्वेने सेंट प्लस आर्ट इंडिया फाउंडेशन आणि पेंट कंपनी यांच्या सहयोगाने माहीम रेल्वे स्टेशनवर कोरोना योद्धांची सुंदर चित्रं साकारली आहेत. माहीम रेल्वे स्टेशन मुंबईचे खरे हिरो म्हणजेच कोरोना योद्धा सुंदर पेटिंग्सने सजले आहे.