मुंबई :दसरा दिवाळी आणि त्या पाठोपाठ येणारे भारतातील इतर राज्यातील सण पाहता लोकांची मागणी वाढते आहे. लोकांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून पश्चिम रेल्वेने बांद्रा टर्मिनस ( Bandra Terminus ) ते जम्मू तवी, मुंबई सेंट्रल ते बनारस, ओखा ते दिल्ली आणि आमदाबाद ते पटना अशा विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे.
पश्चिम रेल्वे द्वारा विशेष ट्रेन : देशभर गणपती नवरात्र सण आणि उत्सव हे कोरोना काळानंतर अत्यंत धूमधाम आणि जल्लोषाने साजरे होत आहे. या सणांच्या काळामध्ये प्रवाशांच्या मागणीनुसार मध्य रेल्वेने नुकत्याच 82 ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलेला होता. त्याच पद्धतीचा निर्णय देखील पश्चिम रेल्वेने घेतलेला आहे. बांद्रा टर्मिनल ते जम्मू तवी बनारस, दिल्ली अहमदाबाद पटना अशा विशेष ट्रेन पश्चिम रेल्वे द्वारा चालवल्या जातील.
प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा : यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सर्व विशेष रेल्वेगाड्यांबाबत तपशील आणि माहिती दिली. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. प्रवासांची संख्या पण वाढत आहे .त्यामुळे आणि तसेच कोरोनानंतर विशेषतः लोकांचा सण आणि उत्सवांमध्ये सामील होण्याचा साजरे करण्याचा ओघ वाढत आहे. त्यामुळेच पश्चिम रेल्वेने काही विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे आणि प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन सुमित ठाकूर यांनी केले आहे. या विशेष ट्रेनची तपशील आणि माहिती खालील प्रमाणे नागरिकांनी या ट्रेन नुसार आपले रेल्वेचे तिकीट आरक्षित करावे.
१) ट्रेन क्रमांक ०९०९७/०९०९८ वांद्रे टर्मिनस - जम्मू तवी एसी सुपरफास्ट स्पेशल (साप्ताहिक)
ट्रेन क्रमांक ०९०९७ वांद्रे टर्मिनस - जम्मू तवी एसी सुपरफास्ट स्पेशल वांद्रे टर्मिनसवरून दर रविवारी २१.५० वाजता सुटेल आणि मंगळवारी जम्मू तवीला ८.४० वाजता पोहोचेल. ही ट्रेन 16 ऑक्टोबर 2022 ते 27 नोव्हेंबर 2022 पर्यंत धावेल.