महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पश्चिम रेल्वेची फेरीवाल्यांविरोधात कारवाई; लाखोंचा दंड वसूल - पश्चिम रेल्वे बातमी

गेल्या वर्षीपासून ते २४ एप्रिल २०२१ पर्यत पश्चिम रेल्वेने रेल्वे स्थानकांच्या परिसरात  १६ हजार ३५३ ठाण मांडलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे.

रेल्वे
रेल्वे

By

Published : Apr 29, 2021, 4:52 PM IST

मुंबई -पश्चिम रेल्वेने रेल्वे परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मोहीम राबवलेली होती. या मोहिमेअंतर्गत गेल्या वर्षीपासून ते २४ एप्रिल २०२१पर्यंत पश्चिम रेल्वेने रेल्वे स्थानकांच्या परिसरात १६ हजार ३५३ ठाण मांडलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ५२ लाख ५४ हजारांचा दंड वसूल करण्यांत आलेला आहे.

१६ हजार ३५३ फेरीवाल्यांवर कारवाई -

उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. या फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना स्थानकात ये-जा करताना गर्दीचा सामना करावा लागतो. या फेरीवाल्यांवर रेल्वेतर्फे वारंवार कारवाई केली जाते. गेल्या वर्षी २०२०मध्ये रेल्वे परिसरातील भिकारी, अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध ८ हजार ६५४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. त्यांच्याकडून ३२ लाख ८४ हजार ५१० रुपयाचा दंड वसूल केला होता. जानेवारी ते २४ एप्रिल २०२१दरम्यान दाखल केलेल्या ७ हजार ६९५ गुन्ह्यांमध्ये १९ लाख ७० हजार ४५ रुपये दंड आकारण्यात आला आहे. जानेवारी २०२० ते एप्रिल २०२१पर्यंत १६ हजार ३५३ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यातून ५२ लाख ५४ हजार ५५५ रुपयांच्या महसूल पश्चिम रेल्वेने गोळा केला आहे.

गेल्या वर्षी पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात ४ हजार ४३८ गुन्ह्यांची नोंद करून त्यामधून २१ लाख ९७ हजार ६०० रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. तसेच जानेवारी ते २४ एप्रिल दरम्यान मुंबई विभागात दाखल केलेल्या ३ हजार ६९८ प्रकरणांतून १५लाख ५० हजारांचा दंड गोळा केल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली. याशिवाय ट्रेन क्रमांक ०९०४५ मध्ये रेल्वे कायद्याच्या कलम १४४ अ अंतर्गत अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध दोन गुन्हे दाखल केले आहेत. एक्स्प्रेसमध्ये अनधिकृत फेरीवाले घुसल्यास प्रवासी १३९या हेल्पलाइन क्रमाकांवर तक्रार करु शकतात.

ABOUT THE AUTHOR

...view details