मुंबई - पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Cm Mamta Banarjee) आज ( मंगळवारी) सायंकाळी साडे सातच्या दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत ( Shiv Sena MP Sanjay Raut ) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Environment Minister Aditya Thackeray ) यांची भेट घेणार आहे. मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये ( Trident Hotel ) ही भेट होणार असून या भेटीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) हे उपस्थित राहणार नाही, अशी माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री अद्यापही रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे. मात्र आज बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत संध्याकाळी होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहतील, अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र रुग्णालयात असल्याने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ममता बॅनर्जी यांना भेटणार नसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र खासदार संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे यांची भेट घेणार आहेत. ममता बॅनर्जी आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर (Mumbai visit) येत आहेत.
असा असेल ममता बॅनर्जी दौरा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुंबईच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज सायंकाळी पाच वाजता त्या मुंबईत दाखल होतील. त्यानंतर सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी ट्रायडंट हॉटेलला रवाना होणार आहेत. तर तिथेच एक डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तीन वाजता भेट घेणार असून सायंकाळी चार वाजता बिझनेस समिट करणार आहेत. तर दोन तारखेला सकाळी त्या पुन्हा एकदा पश्चिम बंगालला रवाना होणार आहेत. 1 डिसेंबर रोजी ममता बॅनर्जी एका महत्त्वाच्या बिजनेस मिटसाठी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हजेरी लावणार आहेत. त्याचबरोबर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या रिसेप्शन कार्यक्रमाला सुद्धा त्या हजेरी लावणार असल्याचे समजते. २ डिसेंबर रोजी त्या पुन्हा कोलकत्त्याला रवाना होणार आहेत.
पक्षाच्या विस्तारासाठी महत्त्वाच्या नेत्यांबरोबर भेटीगाठी -