मुंबई- काही दिवसांपूर्वी मुंबईतील कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( West Bengal Chief Minister Mamata Banerjee) विरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांनी माझगाव दंडाधिकारी न्यायालय म्हणजेच शिवडी न्यायालयात ( Shivadi Court ) याचिका दाखल केली ( Petition Against Mamata Banerjee ) होती. या याचिकेवर बुधवारी (दि. 2 फेब्रुवारी) सुनावणी करण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने ममता बॅनर्जी यांना 2 मार्च, 2022 रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मुंबईतील एका सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रगीताचा रोजी अपमान आणि अनादर केल्याबद्दल ममता बॅनर्जी यांच्या विरोधात राष्ट्र गीताचा अपमान केल्या प्रकरणी न्यायालयासमोर भा.दं.वि.चे कलम 156 ( 3 ) अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशी करण्या संदर्भात आदेश देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे मुंबई सचिव विवेकानंद गुप्ता यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर फौजदारी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी 2 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.