महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Corona : राज्यातील नेते मंडळींच्या घरी लग्नसोहळ्यांचा धडाका! पहा यांना झाली कोरोनाची लागन - Wedding ceremonies at the homes of state leaders!

राज्यातील नेत्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागन झाली आहे. यामधील काही नेत्यांच्या घारी लग्नाचे कार्यक्रम पार पडलेले आहेत. तर, काही नेतेमंडळी इतर नेत्यांच्या घरी असलेल्या लग्नाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र होणाऱ्या कार्यक्रमांबात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Corona
Maharashtra Corona

By

Published : Dec 31, 2021, 1:45 PM IST

मुंबई -राज्यातील नेत्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागन झाली आहे. यामधील काही नेत्यांच्या घारी लग्नाचे कार्यक्रम पार पडलेले आहेत. तर, काही नेतेमंडळी इतर नेत्यांच्या घरी असलेल्या लग्नाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र होणाऱ्या कार्यक्रमांबात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

काल (दि.30 डिसेंबर)रोजी दिवसभर राज्यभरात 5368 इतके करणाचे रुग्ण सापडले. तर, फक्त मुंबईत या रुग्णांची संख्या 3671 एवढी होती. त्यामुळे राज्य आता तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर उभे असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य सरकार तसेच नेतेमंडळींनी याबाबत चांगली काळजी घेतली होती. मात्र, यावेळी वाढत असलेल्या प्रादुर्भावामध्ये नेतेमंडळी मोठ्या प्रमाणात बाधित होताना दिसत आहेत. तसेच, नेते मंडळींकडून मोठ्या प्रमाणात गाफीलपणा देखील समोर आला आहे. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात देखील नेते तसेच मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

या नेत्यांना झाली कोरोनाची लागली

आदिवासी विकास मंत्री के.सी पाडवी यांना हिवाळी अधिवेशन सुरू असताना कोरोना झाल्याचे समोर आले आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली होती. याबाबत ट्विट करून त्यांनी माहिती दिली. तसेच, आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले होते.

खासदार सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह त्यांचे पती सदानंद सुळे आणि दोन्ही मुलांना कोरोनाची लागण झाली असून याबाबत सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून माहिती दिली होती.

सुप्रिया सुळे

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन ट्विटद्वारे केले होते.

बाळासाहेब थोरोत

भाजप नेते हर्षवर्धन पाटील

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांना देखील कोरोनाची लागण झाली असून 28 डिसेंबरला त्यांच्या मुलीचे लग्न पार पडले. या लग्नाला राज्यातील मोठ्या नेत्यांकडून हजेरी लावण्यात आली होती. हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीच्या लग्नाला खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, प्रवीण दरेकर आणि बाळासाहेब थोरात यासारख्या बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती.

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. भाजप नेते शिवाजी कर्डिले यांच्या मुलीचे लग्न सोहळ्यात राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजेरी लावली होती. या लग्न सोहळ्यात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होते.

राज्यात निर्बंध असतानाही मोठ्या प्रमाणात राजकीय लग्नसोहळे

राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना राजकीय लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीचे लग्न 28 डिसेंबरला पार पडली असून मोठ्या थाटामाटात हा लग्नसोहळा पार पडला. तर तिथेच भाजप नेते शिवाजी कर्डिले यांच्याही मुलीच्या लग्नात मोठा थाट पाहायला मिळाला. राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत असतानाही राजकीय लग्नसोहळे मोठ्या थाटामाटात पार पडत आहेत.

जयंत पाटलांनी मुलाचे लग्न केले साध्या पद्धतीत

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे पुत्र राजवर्धन यांचा विवाह नुकताच पार पडला असून या विवाहासाठी जयंत पाटील यांच्याकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र, त्यादरम्यानच राज्य सरकारकडून वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्बंध घालण्यात आले. हे निर्बंध लक्षात घेता लग्नासाठी केवळ दोनशे ते अडीचशे लोकांमध्ये हे लग्न पार पाडले.

जयंत पाटील यांच्या मुलाचा लग्नसोहळा

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details