मुंबई - लग्नाचे आमिष दाखवून अभिनेत्रीवर तब्बल दोन वर्ष बलात्कार करणाऱ्या कास्टिंग डायरेक्टर विरोधात मुंबई पोलिसांच्या वर्सोवा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुष तिवारी असे कास्टिंग डायरेक्टरचे नाव आहे.
अभिनेत्रीच्या प्रेमाचा गैरफायदा -
चित्रपटसृष्टीत वेबसीरिज आणि टीव्ही सिरीयलमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीची कास्टिंग डायरेक्टर आयुष तिवारीसोबत ओळख झाली होती. तब्बल दोन वर्षे एकमेकांच्या संपर्कात राहिल्यामुळे या दोघांमध्ये प्रेम जुळले होते. त्यानंतर आयुष तिवारी याने पीडित अभिनेत्रीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत सतत दोन वर्ष शरीरसंबंध ठेवले होते. शरीर संबंध ठेवल्यानंतर पीडित अभिनेत्री ही गर्भवती राहिली. पीडितेने आयुष तिवारी याच्याकडे लग्नासाठी मागणी केली असता आयुष याने पीडित अभिनेत्रीला टाळण्यास सुरुवात केली.