मुंबई: गणेशोत्सवाच्या काळातराज्यात पावसानेअनेक विभागात चांगलीच हजेरी लावली. यातच आता हवामान विभागाकडून पुन्हा एकदा जोरदारपावसाचा इशारा Warning of heavy rains in Maharashtra देण्यात आला आहे. थोडीफार उघडीप घेतलेला पाऊस आता पुन्हा जोरदार बरसण्याची शक्यता आहे. मधल्या काळात लातूर, बीड, नाशिक, परभणी जिल्ह्यातही पाऊस पडला. आता हवामान विभागाकडून पश्चिम महाराष्ट्रासह, मराठा, विदर्भाला सतर्कतेचा इशारा Meteorological department alert warning देण्यात आला आहे.
मधले काही दिवस पावसाने चांगलीच उघडीप दिली होती. त्यामुळे पीकांना ओढ बसली अनेक भागातील पिके करपण्यास सुरुवात झाली होती. बळीराजा पावसाची अतुरतेने वाट पाहत होता. त्यातच वरुणराजाने मधे अनेक भागात हजेरी लावली काही भागात मुसळधार पाऊस कोसळला. येत्या काही दिवसांत पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने हजेरी लावली. याचबरोबर मराठवाड्यातील लातूर, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातही चांगलाच पाऊस पडला. पावसाने काही भागात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर काही भागात अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.