महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Cloudy weather in Mumbai today : मुंबईत पावसाने फिरवली पाठ

मुंबईत ११ जूनला पावसाने आगमन ( Rains arrived in Mumbai ) केल्याची घोषणा हवामान विभागाकडून ( Meteorological Department ) करण्यात आली. त्यानंतर पाच दिवस पावसाने पाठ फिरवली होती. १५ ते १६ जून या २४ तासात मुंबईत काही प्रमाणात ( rained little in Mumbai) पाऊस पडला. त्यानंतर गेल्या २४ तासात पावसाने पाठ फिरवली ( rain turned its back ) आहे. यामुळे मुंबई हवामान विभागाच्या कुलाबा आणि सांताक्रुझ येथील केंद्रात पावसाची नोंद झालेली नाही. मुंबईत आज ढगाळ वातावरण राहणार ( Cloudy weather in Mumbai today )असून काही ठिकाणी पावसाच्या सरी किंवा मध्यम पाऊस पडू शकतो. असे, हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Rains turn the tide in Mumbai
मुंबईत पावसाने फिरवली पाठ

By

Published : Jun 17, 2022, 1:47 PM IST

मुंबई - मुंबईत ११ जूनला पावसाने आगमन ( Rains have arrived in Mumbai ) केल्याची घोषणा हवामान विभागाकडून ( Meteorological Department ) करण्यात आली. त्यानंतर पाच दिवस पावसाने पाठ फिरवली होती. १५ ते १६ जून या २४ तासात मुंबईत काही प्रमाणात ( rained little in Mumbai) पाऊस पडला. त्यानंतर गेल्या २४ तासात पावसाने पाठ फिरवली ( rain turned its back ) आहे. यामुळे मुंबई हवामान विभागाच्या कुलाबा आणि सांताक्रुझ येथील केंद्रात पावसाची नोंद झालेली नाही. मुंबईत आज ढगाळ वातावरण राहणार ( Cloudy weather in Mumbai today )असून काही ठिकाणी पावसाच्या सरी किंवा मध्यम पाऊस पडू शकतो. असे, हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

पावसाची हजेरी आणि पाठ -जून ते सप्टेंबर या कालावधीत पाऊस पडतो. मात्र मुंबईत जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस पडला नव्हता. ९ जून, १० जूनला सायंकाळी पाऊस पडला. ११ जूनला पाऊस मुंबईत दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागाकडून करण्यात आली. त्यानंतर मात्र, मुंबईतून पावसाने पाठ फिरवली होती. १६ जूनला पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा पावसाने पाठ फिरवली आहे.

पाणी तुंबण्याच्या ठिकाणी ही व्यवस्था - मुंबईत ३८६ फ्लडिंग पाॅईट्स होते, त्यापैकी यंदा २८२ फ्लडिंग पाॅईट्स कमी झाले आहेत. तर १०४ फ्लडिंग पाॅईट्स असून त्यापैकी ३० फ्लडिंग पाॅईट्स जवळ उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उर्वरित ७१ ठिकाणी उपाययोजना करण्यात येत असून पुढील दोन वर्षांत ७१ फ्लडिंग पाॅईट्स पूरमुक्त होतील. यंदा पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा उपसा करण्यासाठी ४७७ पंप कार्यरत असतील. हिंदमाता परिसर पाण्याखाली जाऊ नये यासाठी भूमिगत टाक्या बसवल्या असून ३ कोटी लिटर पाणी साठा होऊ शकतो. पावसाचे पाणी साचल्यामुळे पुर आल्यास एन डी आर एफ, नौदल तैनात करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details