मुंबई -भाजपला रोखण्यासाठी जर शिवसेनेला ( Nana patole comment on shivsena ) आमचा बाहेरून पाठिंबा देण्याची आवश्यकता असल्यास काँग्रेस ( Congress support to shivsena says patole ) पक्ष शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देखील देण्यास तयार आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Stop bjp comment nana patole ) यांनी काँग्रेसच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांना दिली आहे.
हेही वाचा -Sharad Pawar On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना भाजपाची फूस! गुजरात आणि आसाममध्ये सत्ता कोणाची? - शरद पवार
वेळ आली तर शिवसेनेने बाहेरून पाठिंबा मागितला तर महाविकास आघाडीसाठी तरी आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहोत. पण, त्यांच्याकडून काही गडबड झालीच तर आम्ही विरोधात बसायलाही तयार आहोत. ही भूमिका आम्ही सकाळीच मांडली आहे, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. तसेच, महाविकास आघाडी 5 वर्षे पूर्ण करणार, असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला.
राजकीय महाभारत क्षमले पाहिजे. या अस्थीर व्यवस्थेमध्ये जे राज्याच्या जनतेचे नुकसान होत आहे, राज्याच्या विकासाचे नुकसान होत आहे, ते थांबले पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. महाविकास आघाडीचे सरकार राहण्याच्या दृष्टिकोनातून आमचे विचारमंथन झालेले आहे. संजय राऊतांच्या वक्तव्याबाबतही चर्चा झाली. राऊतांचे वक्तव्य त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाबींवर आहे, महाविकास आघाडीबाबत नाही. भाजपने जो काही शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे तो कसा थांबवता येईल त्याबाबतही चर्चा सुरू आहे. काँग्रेस मविआत आहे आणि राहणार, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली.
राज्यपाल कुणाचे ऐकतात हे सांगण्याची गरज नाही. भाजप अस्थिरता निर्माण करत आहे. ज्यांनी महाराष्ट्रात सत्तासंघर्ष आणि अस्थिरता निर्माण केली, तो भाजप समोर का येत नाही? त्यांच्याकडे अजूनही बहुमत नाही. त्यांना सत्तेची लालसा आहे. ईडीच्या माध्यमातून या पद्धतीने लोकशाहीचा खून करण्याचे काम करते. भाजपला आव्हान करतो की सरकार अल्पमतात असेल तर त्यांनी तसे दाखवावे, असे आवाहन नाना पटोले यांनी केले.
सह्याद्री अतिथीगृहावर काल काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी एस.के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री असलम शेख, मंत्री नितीन राऊत, मंत्री सुनील केदार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह ज्येष्ठ मंत्र्यांची उपस्थिती होती.
हेही वाचा -Sharad Pawar On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना भाजपाची फूस! गुजरात आणि आसाममध्ये सत्ता कोणाची? - शरद पवार