मुंबई - मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या घरावर आज आयकर विभागाने छापेमारी केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या छापेमारीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सूचक इशारा दिला आहे. 2024पर्यंत आम्हाला हे सहन करावं लागेल. (Yashwant Jadhav) महाराष्ट्राला सहन करावे लागेल असही राऊत म्हणाले आहेत.
यशवंत जाधव यांच्यावर 15 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप
पश्चिम बंगालला सहन करावं लागेल. उत्तराखंड आणि पंजाबलाही सहन करावे लागेल, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. तसेच महापालिका निवडणुका होणार आहेत. (Income Tax Raids Yashwant Jadhav Home) त्यामुळे ही छापेमारी सुरू झाल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हा दावा केला. दरम्यान, यशवंत जाधव यांच्यावर 15 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. (sanjay raut) तसेच ती रक्कम युएईला ठेवली असल्याची चर्चा आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनीही जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे आज त्यांच्या घरावर छापे मारण्यात आले आहेत.