मुंबई- गेल्या पाच वर्षात राज्यात विकास प्रकल्प सुरू करण्यात आले. तसेच बुलेट ट्रेन सारख्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. मात्र, या प्रकल्पाच्या निधी संदर्भात राज्याची आर्थिक स्थिती कशी आहे. याबाबत श्वेतपत्रिका काढावी लागणार आहे, असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. विधानभवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत भुजबळ बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित होते.
राज्याच्या आर्थिक स्थितीची श्वेतपत्रिका काढू- छगन भुजबळ - chhagan bhujbal as a cabinet minister
विधानभवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री छगन भुजबळांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित होते.
श्वेतपत्रिका काढण्याआधी राज्यातील सर्व प्रकल्पांचा आढावा घेणे गरजेचे आहे. राज्यात बुलेट ट्रेनसह सर्व विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यात येईल. त्यानतर सरकार श्वेतपत्रिका काढेल, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.
श्वेतपत्रिकेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट मत व्यक्त केले नाही. मात्र, सरकार आता नव्याने स्थापन झाले आहे. राज्यातले प्रकल्प कसे सुरू आहेत. या प्रकल्पांची स्थिती काय आहे. कोणते प्रकल्प अत्यावश्यक आहेत. तसेच कोणत्या प्रकल्पांची सध्या गरज आहे. या गोष्टींचा लवकरच आढावा घेऊ असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.