मुंबई -मुंबईत कोरोनाचा प्रसार कमी झाला आहे. मात्र कोरोना गेलेला नाही. त्यातच नाताळ आणि 31 डिसेंबर येत आहे. अशा वेळी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जर नियमांचे पालन तुम्ही करत नसाल तर तुमचे लायसन्स रद्द का करू नये असा प्रश्न उपस्थित करत हॉटेल चालकांना इशारा दिला आहे. नियम पाळले जाणं ही हॉटेलधारकांचीही जबाबदारी असल्याचे महापौरांनी म्हटले आहे.
AP Dhillon Concert : तर तुमचे परवाने रद्द करू, महापौरांचा हॉटेल चालकांना इशारा - मुंबई पोलीस
ए.पी. ढिल्लॉनचा म्युजिक कोन्सर्ट (AP Dhillon Music Concert) काल रविवारी आयोजित करण्यात आला होता. ग्रँड हयात हॉटेलमधील कॉन्सर्टमध्ये अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan), तिचा भाऊ इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan), जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) उपस्थित होते.

तर लायसन्स रद्द करू -
मुंबईच्या सांताक्रूझ येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ए.पी. ढिल्लॉनचा म्युजिक कॉन्सर्ट (AP Dhillon Music Concert) काल रविवारी आयोजित करण्यात आला होता. ग्रँड हयात हॉटेलमधील कॉन्सर्टमध्ये अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan), तिचा भाऊ इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan), जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) उपस्थित होते. तसेच या ठिकाणी कोरोना नियमांची पायमल्ली करण्यात आली. ५० टक्के क्षमतेने कार्यक्रमांना परवानगी असताना या कार्यक्रमाला लोकांनी गर्दी केली होती. कोविड नियमांचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी काल रविवारी ग्रँड हयातमध्ये आयोजित ए पी ढिल्लॉनच्या म्युजिक कॉन्सर्टवर कारवाई केली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी नियम तोडल्यास लायसन्स रद्द करण्याचा इशारा दिला आहे. पालिकेने क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीला परवानगी दिली आहे. याचा कोणी गैरफायदा करून घेऊ नका, सर्वाना नियम समान आहेत. हॉटेल चालकांनी काळजी घ्यावी असे आवाहनही महापौरांनी केले आहे. नियम पाळले जाणं ही हॉटेलधारकांचीही जबाबदारी असल्याचे महापौरांनी म्हटले आहे.
राजकीय व्यक्तींनीही नियम पाळावे -
जर आपले मुख्यमंत्री काटेकोर नियमांच पालन करतात. तर राजकिय व्यक्तींनीही नियम पाळलेच पाहिजे. स्वत:ला नेते म्हणवता तर लोकांचं प्रबोधन करा. राजकारण कसलं करताय असा सवाल भाजपा आमदार राम कदम यांच्या वक्तव्यावर महापौरांनी केला आहे. काही लोक अजून नियम पाळताना दिसत नाहीत. कोरोना सोबत ओमिकक्रॉनच संकट आहे. आपण उशिरा अनलॉक केल आहे. आपण बाहेर जातो पण घरी असलेल्या सदस्याचा विचार करा. नागरिकांनी नियमाचं पालन करावं. जे सुशीक्षीत आहेत तसेच राजकीय लोकांनी सुद्धा नियम पाळावेत असे आवाहन महापौरांनी केले आहे.
2 अभिनेत्री पॉझिटीव्ह
अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) व अमृता अरोरा (Amruta Arora) कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्याची पुष्टी महापौरांनी केली. दोन्ही अभिनेत्री पॉझिटिव्ह आल्याने त्या कुठे कुठे गेल्या होत्या याचा पालिका अधिकारी शोध घेत आहेत. त्यांच्या सहवासात आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करण्यात आल्याची माहिती महापौरांनी दिली.
हेही वाचा -First Omicron Death : चिंता वाढली! इंग्लंडमध्ये ओमायक्रॉनचा जगातील पहिला मृत्यू