मुंबई : मराठा व ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला धारेवर धरणाऱ्या भाजपचे नेते आशिष शेलार यांनी येत्या अधिवेशनात सरकारला घेरण्याचा इशारा दिला आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना सर्व प्रश्नांवरून आम्ही घेरणार आहोत असे शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.
अधिवेशनात सरकारला घेरणार
मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यानेही राजकारण चांगेलच तापले आहे. अशातच राज्यात होऊ घातलेल्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारला धारेवर धरण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. दोन दिवसीय अधिवेशनात राज्य सरकारला आम्ही चांगलंच घेरणार आहोत. या अधिवेशनात मराठा, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न व शेतकऱ्याच्या मुद्यांवर आम्ही सरकारला सडेतोड प्रश्न विचारणार आहोत, असे शेलार यांनी म्हटले आहे.