मुंबई - निवडणूक आयोगाने ठाकरे गटाचे निवडणूक चिन्ह त्याचबरोबर शिवसेना या नावाला पाबंदी लावल्यानंतर आता याप्रकरणी एकनाथ शिंदे गटाने ( EKanath Shinde group ) यासाठी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांना जबाबदार ठरवले आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते, मंत्री दीपक केसरकर ( Shinde group spokesperson Minister Deepak Kesarkar ) यांनी या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सर्वात जास्त मतदान आमच्याकडे?याप्रसंगी बोलताना दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) म्हणाले की, निवडणूक चिन्हावर आमचा अधिकार आहे. सर्वात जास्त मतदान आमच्याकडे आहे.हे चिन्ह ज्यांच्यामुळे गोठले गेले ते याचे खापर आमच्यावर फोडत आहेत. परंतु चिन्हावर आमचा अधिकार असून खऱ्या अर्थाने शिवसेना व पक्ष चिन्हावर आमचाच अधिकार आहे. खासदारकीच्या निवडणुकीत आम्हाला ७० लाख तर आमदारकीच्या निवडणुकीत ३७ लाख मते आमच्या उमेदवारांना भेटली. त्याचबरोबर पक्षांचे पदाधिकारी वेगवेगळ्या राज्यातील प्रमुख हे आमच्या सोबतच आहेत.
दुःख तुम्हाला नाही आम्हाला झाले आहे?आम्ही निवडणूक आयोगाकडे कधीच तारीख मागितली नाही. त्यांनी अनेक तारखा मागितल्या.त्यांनी प्रतिज्ञा पत्र दिले नाही. आमची बाजू खरी आहे आम्हाला न्याय भेटेल. चिन्ह आमचे आहे ते आम्हाला भेटायला पाहिजे. दुःख तुम्हाला का होते. आम्हाला व्हायला पाहिजे. इथे लोकशाहीचा अपमान होत नाही. ही लोकशाहीची हत्या नाही. अंतरिम ऑर्डर ही काय पहिल्यांदा दिली गेली नाही. चिन्ह गेलं अशी ओरड करून केवळ सहानभुती मिळवण्याचा प्रयत्न. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच सहानभुती मिळवलेली नाही. धनुष्यबाण हा आमचा अधिकार आहे. आम्हाला दुःख झाले आहे. यांनी फक्त तारखा घेतल्या आम्ही कागदपत्रं सादर केली.
आमचं धनुष्यबाणावर प्रेम -ज्यांचं निशाणीवर प्रेम नाही तेच आज आरोप करत आहेत. आमचं निशाणीवर प्रेम आहे. आमचं धनुष्यबाणावर प्रेम आहे. धनुष्यबाणासाठी आमचा लढा सुरुच आहे. चिन्ह गेलं अशी ओरड करून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. बाळासाहेबांनी कधीही अशी सहानुभूती मिळवली नाही. लोकांना कामाने जिंकावं लागतं. आमची भूमिका ठाम आहे. आमचा धनुष्यबाणावरील दावा कायम आहे. आम्ही त्यासाठी आयोगाकडे जाणार आहोत. आम्ही भूमिका घेतल्यानंतर तुम्ही बाळासाहेबांचे नाव पुढे लावायला लागला. अशी टीका दीपक केसरकर यांनी केली आहे.