नागपूर - आघाडी हा शब्द बदला कारण निवडणुकांचे निकाल येतात तेव्हा आघाडीचा प्रयोग कधीही यशस्वी झाला नाही. पण देशातील महत्वाचे नेते केसीआर आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली. (Telangana CM K Chandrashekhar Rao) त्यांच्यात अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. (CM Uddhav Thackeray with KCR) विकासाचे आज देशाच्या राजकारणावर दशा आणि दिशा यावर तब्बल साडेचार तास ही चर्चा चालली. त्यामुळे ही भेटही नक्कीच महत्वाची आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.
उत्तर प्रदेशात भाजपा पराभूत होत आहे
आम्ही कधीच नाही म्हणालो की काँग्रेसच्या शिवाय आघाडी बनवायची आहे. जेव्हा ममता बॅनर्जी यानी सूतोवाच केले, तेव्हा शिवसेना पहिला पक्ष होता जो काँग्रेससोबत नवीन आघाडी बनली पाहिजे असे स्पष्ट केले होते. दरम्यान, भाजपची सवय आहे जेव्हा ते पराभूत व्हायला लागतात तेव्हा अशा पद्धतीचे आरोप करतात. (KCR-Uddhav Thackeray PC) उत्तर प्रदेशात भाजपा पराभूत होत आहे. त्यामुळेच त्यांचे प्रयत्न सुरू करून देशात लोकशाही संपत आहे हेच त्याचे परिणाम आहे असही राऊत म्हणाले आहेत.
त्यांचा पक्ष दिवसागणिक घसरतो त्याची काळजी घ्यावी