महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

CM Comment On Bjp : आम्ही उठसूठ राजभवनाची वारी करत नाही; मुख्यमंत्र्यांचा भाजपला चिमटा - मुख्यमंत्र्यांचे भाषण बातमी

विरोधीपक्षात असताना वर्षातून एखाद-दुसऱ्यावेळी शिष्टमंडळ घेऊन राजभवनात येत होतो. असे सांगत उठसूठ राजभवनाची वारी करणाऱ्या भाजपचे नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिमटा काढला आहे. (President at Raj Bhavan In Mumbai) तसेच, आधुनिकीकरणाच्या नावाखाली मॉर्डन वास्तू उभी करताना आपली संस्कृती जपावी, असे आवाहन देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Feb 11, 2022, 1:20 PM IST

मुंबई - राजभवन, दरबार हॉल आमच्यासाठी नवीन नाही. विरोधीपक्षात असताना वर्षातून एखाद-दुसऱ्यावेळी शिष्टमंडळ घेऊन राजभवनात येत होतो. असे सांगत उठसूठ राजभवनाची वारी करणाऱ्या भाजपचे नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिमटा काढला आहे. तसेच, आधुनिकीकरणाच्या नावाखाली मॉर्डन वास्तू उभी करताना आपली संस्कृती जपावी, असे आवाहन देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे. यावेळी राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या दरबार हॉलचे (President Ramnath Kovind) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. (CM Uddhav Thackeray) सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रपतींच्या हस्ते राजभवनातील दरबार हॉलचे उद्घाटन

नूतनीकरण केलेल्या ऐतिहासिक -

वैभवशाली परंपरा लाभलेल्या या उद्घाटनाला उपस्थित राहता आल्याचा मला मुख्यमंत्री म्हणून आनंद आहे. दरबार हॉल, राजभवन आमच्यासाठी नवे नाही. (INAUGURATION OF THE NEW DARBAR HALL In MUMBAI) विरोधी पक्षात होतो, तेव्हा वर्षभरातून एखाद दुसर्‍या वेळी शिष्टमंडळ घेऊन येत होतो. आमच्या व्यथा मांडत होतो, तसाच आजही आमचा संवाद सुरू आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगत सातत्याने राजभवनवर जाऊन राज्यपालांना गाऱ्हाणे सांगणाऱ्या भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते राजभवनातील दरबार हॉलचे उद्घाटन

वास्तूमध्ये ज्यांचा हातभार लागला त्या सर्वांचे आभार

या वस्तूंची शंभर वर्षांहून अधिक काळात घडलेल्या घटना व घडामोडी पाहिल्या आहेत. (30 एप्रिल 1960)रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या नकाशाचे अनावरण तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी याच वास्तूत केले होते. असा दाखला मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला आहे. तसेच, नवीन रूप धारण केलेली वास्तूमध्ये ज्यांचा हातभार लागला त्या सर्वांचे आभार मानले.

ग्यानी झेलसिंग यांनी शिवसेनाप्रमुखांना बोलावले होते

दरबार हॉलचे अप्रतिम सौंदर्य नव्या दमाने लोकांसमोर ठेवले. मुंबईतील राजभवन देशातील सर्वोत्तम राजभवन आहे. एका बाजूला अथांग समुद्र दुसऱ्या बाजूला सुंदर झाडे, ज्याला शहरातील जंगल असे देखील म्हणता येईल. राजभवन यामुळे अधिकच सुंदर दिसते. इथली हवा थंड आहे राजकीय हवा कशी असली तरी, इथली हवा थंड आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. तसेच, पावसाळ्यात नाचणारे मोर आहेत. इतर सर्प मित्राकडून विषारी साप पकडण्याचे फोटो आपण पाहतो, अशी वास्तू शोधून सापडणार नाही असे सांगत ब्रिटिश गव्हर्नरचे चौथे निवास्थान असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ग्यानी झेलसिंग यांनी शिवसेनाप्रमुखांना बोलावले होते, तर प्रणवदा यांनी मला भेटायला बोलावले, अशा अनेक आठवणी वास्तूबाबत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

राष्ट्रपतींच्या हस्ते राजभवनातील दरबार हॉलचे उद्घाटन

आधुनिकता अंगी बाळगताना संस्कृती जपणे, जुन्या-नव्या यांचा समतोल साधणे गरजेचे

संपूर्ण वास्तूचे जुने वैशिष्ट्य जगात आपण नवीन वास्तू उभारली आहे. जुना वारसा जपून आपण आधुनिकीकरणकडे चाललो आहोत. हे या वास्तूचे वैशिष्ट्य आहे. ऊन, वारा, पाऊस झेलतांना इमारतीवर ही परिणाम होतो. मात्र, वैशिष्ट्य कायम ठेवून नूतनीकरण करण्याचे आव्हान पेलण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आधुनिकता अंगी बाळगताना संस्कृती जपणे, जुन्या-नव्या यांचा समतोल साधणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगत पारतंत्र्याच्या घटनांची आठवण जपणारी वास्तू सशक्त लोकशाहीचा वारसा पाहण्यासाठी सज्ज झाल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच, या वास्तुत आनंददायी घटना घडत राहतील अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

हेही वाचा -'दीदींच्या स्मारकाचा वाद थांबवा, संगीत महाविद्यालय हीच खरी श्रद्धांजली'; ह्रदयनाथ मंगेशकरांची विनंती

ABOUT THE AUTHOR

...view details