मुंबई -विधानसभेत आज ( 4 जुलै ) विश्वासदर्शक ठराव पारित करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बहुमत चाचणी जिंकली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे सोबत असलेल्या आमदारांनी आतापर्यंत चुप्पी साधली आहे. त्यांचे प्रवक्ते दीपक केसरकर हेच बंडखोर आमदारांची प्रतिक्रिया मांडत होते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर त्यांचे समर्थक आमदार बोलू लागले आहेत. आमदार प्रताप सरनाईक ( Pratap Sarnaik ) यांनीही 'ईटिव्ही भारत'ला आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Pratap Sarnaik : 'आम्ही शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक, भाजप बरोबर...'; 'ईटिव्ही भारत'ला प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया - बंडखोर आमदार प्रताप सरनाईक मराठी बातमी
आम्ही शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक आहे. भाजप बरोबर युती करण्यासंदर्भात पूर्वीपासूनच आग्रही होतो, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक ( Pratap Sarnaik ) यांनी दिली आहे.
Pratap Sarnaik
प्रताप सरनाईक म्हणाले की, आम्ही शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक आहे. भाजप बरोबर युती करण्यासंदर्भात पूर्वीपासूनच आग्रही होतो. कारण 2019 च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने त्या पद्धतीचा जनादेश आम्हाला दिला होता, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा -CM On VAT Of Petrol : जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी करु - मुख्यमंत्री