महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Water Taxi In Mumbai : मुंबईत आता 'वॉटर टॅक्सी', अवघ्या १३ मिनिटात दक्षिण मुंबईतून नवी मुंबई विमानतळावर जाता येणार : गडकरींची घोषणा

मुंबईतील वाहतूक कोंडीवर ( Traffic Jam In Mumbai ) उपाय काढण्यासाठी वेगवेगळे पर्याय समोर येत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Minister Nitin Gadkari ) यांनी मुंबईत वॉटर टॅक्सीची घोषणा केली ( Water Taxi In Mumbai ) आहे. याद्वारे अवघ्या १३ मिनिटात दक्षिण मुंबईतून नवी मुंबई विमानतळावर ( New Mumbai Airport ) जाता येणार आहे.

वॉटर टॅक्सी
वॉटर टॅक्सी

By

Published : Feb 5, 2022, 8:58 PM IST

मुंबई- वाहतूक कोंडीवर मार्ग ( Traffic Jam In Mumbai ) काढण्यासाठी समुद्र आणि नदीकाठच्या शहरांमध्ये जलवाहतूक विकसित करण्यावर भर देणार असल्याची माहिती आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी ( Minister Nitin Gadkari ) दिली. मुंबईतील एका कार्यक्रमात ते बोलत होते. वॉटर टॅक्सीच्या ( Water Taxi In Mumbai ) माध्यमातून दक्षिण मुंबईतून फक्त 13 मिनिटात नवी मुंबई विमानतळावर ( New Mumbai Airport ) पोहोचता येईल असा दावा त्यांनी केलेला आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्टकडे सर्वेक्षण प्रस्ताव तयार

मुंबईतील रहदारीची समस्या सोडवण्यासाठी अधिकाअधिक वॉटर टॅक्सीचा वापर वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे जल वाहतुकीबाबत मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षांकडे सर्वेक्षण केलेला प्रस्ताव तयार आहे. नवी मुंबई येथील विमानतळ पूर्ण झाल्यानंतर जल मार्गातून विमानतळावर जाण्याची व्यवस्था उभारली जाईल. त्यासाठी फक्त पाठपुरावा करण्याची गरज आहे. ही योजना प्रत्यक्षात आली तर, दक्षिण मुंबईतून नवी मुंबई विमानतळ अंतर फक्त 13 मिनिटात गाठता येईल. सगळ्या मुंबईच्या किनार्‍यावरून वॉटर टॅक्सी सुरु केल्यास रस्ते आणि रेल्वेचा वापर करणाऱ्यापैकी 75 टक्के मुंबईकर जलमार्गाने प्रवास करतील. त्यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार असून प्रदूषणही कमी होईल.

लवकरच वॉटर टॅक्सी

मुंबई नजीकच्या शहरातून सकाळी व गर्दीच्यावेळी येताना वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. रस्ते वाहतुकीवरील ती कोंडी फोडण्यासाठी आणि पर्यावरणस्नेही म्हणून जलमार्ग वाहतुकीला चालना देण्यात येणार आहे. मुंबईच्या नजीकच्या शहरात जलमार्गाने जोडणाऱ्या वॉटर टॅक्सी आणि रो रो बोटीच्या जलमार्ग वाहतुकीची सुरुवात करण्याची घोषणा गेल्या काही वर्षांपूर्वी केली होती. प्रत्यक्षात गेल्यावर्षीपासून भाऊचा धक्का ते अलिबाग दरम्यान रोरो बोट सेवा सुरू झाली आहे. वॉटर टॅक्सी सुद्धा मुंबईत दाखल झाली आहे. लवकरच वॉटर टॅक्सी सेवा मुंबईकरांसाठी सुरू होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details