मुंबई - मुंबई आणि नवीमुंबई बेलापूर मार्गावर चालविणारी सर्वाधिक मोठी ५६ आसनी हायस्पीड वॉटर टॅक्सी प्रवासी मिळत नसल्याने अडचणीत सापडली आहेत. प्रवासी अभावी कंपनीला दररोज डिझेल खर्चासाठी दररोज ५० हजार रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे वॉटर टॅक्सी बंद ठेवण्याची नामुष्की कंपनीवर आली आहे. परिणामी सोमवारी ते शुक्रवार बेलापूर-भाऊचा धक्का आणि शनिवार व रविवारी बेलापूर-एलिफंटा या मार्गांवर वॉटर टॅक्सी चालवण्याचा निर्णय गेटवे-एलिफंटा प्लिजर टूर अँड ट्रॅव्हल्स लिमिटेड’ने यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी ईटीव्ही भारताला दिली.
कंपनीचा सदस्यांची तातडीने बैठक -
मुख्यमंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हस्ते आठवड्याभरापूर्वी मोठ्या थाटा-माटात सुरु झालेल्या हायस्पीड वॉटर टॅक्सी सेवेला अद्यापही प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. नवी मुंबईच्या बेलापूर बंदरावरून सोमवारी सकाळी भाऊच्या धक्क्याच्या दिशेने ५६ आसनी वॉटर टॅक्सी सेवा सुरु झाली आहे. गेल्या तीन एकही प्रवासी या वॉटर टॅक्सीला मिळाला नसल्याने कंपनीला मोठ्या प्रमाणात नुकसान होता आहे. एका फेरीसाठी २५ हजार रुपयांप्रमाणे दोन फेऱ्यांसाठी डिझेल खर्च म्हणून ५० हजार रुपये प्रति दिवस नुकसान वॉटर टॅक्सी कंपनीला होत आहे. त्यामुळे आज गेटवे-एलिफंटा प्लिजर टूर अँड ट्रॅव्हल्स लिमिटेड’ वॉटर टॅक्सी सेवा बंद करून कंपनीच्या सभासदांची तातडीची बैठक बोलविली होती. या बैठकीत कंपनीला नुकसान होऊ नयेत म्हणून, सोमवारी ते शुक्रवार बेलापूर-भाऊचा धक्का आणि शनिवार व रविवारी बेलापूर-एलिफंटा या मार्गांवर वॉटर टॅक्सी चालवण्याचा निर्णय गेटवे-एलिफंटा प्लिजर टूर अँड ट्रॅव्हल्स लिमिटेड’ घेतला आहेत.
बेलापूर-एलिफंटा मार्गाला पसंती -