मुंबई -मुंबई ते नवीमुंबईचा प्रवास आता अवघ्या काही मिनिटांवर येणार आहे. कारण अत्याधुनिक वॉटर टॅक्सी ( Water Taxi In Mumbai ) मुंबईत दाखल झाली असून मुंबईकरांची वेळेची बचत होणार आहे. कमीत कमी वेळेत मुंबईपासून नेरूळ, बेलापूर, जेएनपीटी आणि एलिफंटा ( Nerul, Belapur, JNPT and Elephanta Way ) येथे अवघ्या काही मिनिटात पोहोचता येणार आहे. या वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi will Inaugurate ) यांच्या हस्ते संक्रांतीच्या मुहूर्तावर करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. मात्र, तूर्तास याबाबद पंतप्रधान कार्यालयाने ( Prime Ministers Office ) वेळे दिलेली नाही.
- 'या' दोन कंपन्याकडे जबाबदारी
सागरमाला उपक्रमांतर्गत देशातील समुद्रकिनार्याचा उपयोग करून जलवाहतुकीला प्राधान्य देण्याची महत्त्वाकांक्षी योजना सरकारने आखली आहे. त्यामाध्यमातून मुंबईच्या नजीकच्या शहरांना जलमार्गाने जोडणाऱ्या वॉटर टॅक्सी सुरु करण्याची घोषणा सरकारने केली होती. यामध्ये १२ वॉटर टॅक्सीचे मार्ग असून यापैकी मुंबई ते बेलापूर दरम्यान वॉटर टॅक्सी येत्या काही दिवसात सुरु होणार आहे. विशेष म्हणजे ही योजना मुंबई पोस्ट ट्रस्ट, महाराष्ट्र मेरीटाईन बोर्ड आणि सिडको मिळून राबिवित आहे. वॉटर टॅक्सी सेवा चालविण्याची जबाबदारी इन्फिनिटी हार्बर सर्विस आणि वेस्ट कोस्ट मरिन या दोन खासगी कंपनीला दिली आहे.
- असे असणार वॉटर टॅक्सीचे मार्गावर
वॉटर टॅक्सीचा नेरूळ ते बेलापूर, बेलापूर ते जेएनपीटी, जेएनपीटी ते एलिफंटा आणि एलिफंटा ते नेरूळ असा पहिला मार्ग असणार आहे. तर दुसरा मार्ग हा डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल भाऊचा धक्का ते जेएनपीटी आणि एलिफंटा ते नेरूळ असा असणार आहे. तिसरा मार्ग मुंबई डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल ते बेलापूर ते नेरूळ ते डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल असणार आहे.
- वॉटर टॅक्सीची आसन क्षमता
इन्फिनिटी हार्बर सर्विस कंपनीकडे सध्या चार हायस्पीड वॉटर टॅक्सी आहे. यापैकी एक ५० सीटर, ४० सीटर, ३२ सीटर आणि एक २० सीटर वॉटर टॅक्सी आहे. याशिवाय वेस्ट कोस्ट मरिन कंपनीकडे दोन १२ सीटर, आणि एक २० सीटर वॉटर टॅक्सी अशा सात वॉटर टॅक्सी सध्या तयार आहे. याउलट भविष्यात प्रतिसाद पाहून ६ आसनी आणि १० आसनी क्षमतेच्या प्रत्येकी दोन बोटी वाढवण्यात येतील. नेरूळ ते बेलापूर, जेएनपीटी ते एलिफंटा अशा अंतराने लहान असलेल्या जल मार्गांवर या बोटी चालवल्या जातील. या मार्गांसाठी किमान १५० रुपये आकारले जातील, अशी माहिती इन्फिनिटी हार्बर सर्विस कंपनीचे सोहेल कझानी यांनी दिली आहे.
- २५ नॉट्स वेगाने धावणार वॉटर टॅक्सी