मुंबई- मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यावर्षीच्या डिसेंबर महिन्यात वॉटर टॅक्सी आणि रोपॅक्स फेरी या जलमार्ग वाहतुकीची सुरूवात होणार आहेत. यामध्ये वॉटर टॅक्सीचे १२ आणि रोपॅक्स फेरी सेवेचे ४ नवे मार्ग लवकरच सुरू केले जाणार आहेत, अशी माहिती जलमार्ग मंत्रालयाचे राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे.
मुंबईकरांसाठी खूशखबर.. वॉटर टॅक्सी व रोपॅक्स फेरी डिसेंबरपर्यंत होणार सुरू, चार नवे मार्ग लवकरच - वॉटर टॅक्सी व रोपॅक्स फेरी
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यावर्षीच्या डिसेंबर महिन्यात वॉटर टॅक्सी आणि रोपॅक्स फेरी या जलमार्ग वाहतुकीची सुरूवात होणार आहेत. यामध्ये वॉटर टॅक्सीचे १२ आणि रोपॅक्स फेरी सेवेचे ४ नवे मार्ग लवकरच सुरू केले जाणार आहेत.
रोपॅक्स-फेरी सेवेचे ४ नवे मार्ग -
मुंबईनजीकच्या शहरांतून सकाळी व गर्दीच्यावेळी येताना वाहन चालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. रस्ते वाहतुकीवरील ही कोंडी फोडण्यासाठी आणि पर्यावरण स्नेही म्हणून जलमार्ग वाहतुकीला चालना देण्यासाठी मुंबईच्या नजीकच्या शहरांना जलमार्गाने जोडणाऱ्या वॉटर टॅक्सी आणि रोपॅक्स फेरी या जलमार्ग वाहतुकीची सुरूवात यावर्षी डिसेंबरमध्ये करण्याचे प्रयोजन असल्याची माहिती बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे. या जलमार्ग वाहतूक प्रकल्पाची आढावा बैठक बुधवारी व्हीडियो कॉन्फरन्स पद्धतीने पार पडली. यामध्ये वॉटर टॅक्सीचे १२ आणि रोपॅक्स फेरी सेवेचे ४ नवे मार्ग लवकरच सुरू केली जाईल, अशी माहिती मांडवीय यांनी दिली.