महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BMC Meeting For Mosquito : आयुक्तांचा इशारा, 30 एप्रिलपूर्वी पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधक करा; अन्यथा... - पाण्याच्या टाक्या डास प्रतिंबधक करा

मुंबईमधील सर्व शासकीय, निमशासकीय यंत्रणांनी आपापल्‍या अखत्‍यारितील कार्यालये व परिसरांमध्‍ये पाण्‍याच्‍या टाक्‍या डास प्रतिबंधक ( Water Tanks Mosquito Repellent ) करावे. ही सर्व कामे ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करावीत, असे निर्देश पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी ( BMC Commissioner Iqbal Singh Chahal ) दिला आहे.

BMC Meeting For Mosquito
BMC Meeting For Mosquito

By

Published : Mar 21, 2022, 9:20 PM IST

मुंबई - मुंबईमधील सर्व शासकीय, निमशासकीय यंत्रणांनी आपापल्‍या अखत्‍यारितील कार्यालये व परिसरांमध्‍ये पाण्‍याच्‍या टाक्‍या डास प्रतिबंधक ( Water Tanks Mosquito Repellent ) करावे. ही सर्व कामे ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करावीत. तसेच, कोठेही पाणी साचून डासांची उत्‍पत्‍ती होणार नाही. याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असे निर्देश महापालिका आयुक्‍त डॉ. इक्बाल सिंह चहल ( BMC Commissioner Iqbal Singh Chahal ) यांनी दिले आहेत. डासांची उत्पत्ती स्थाने आढळून आल्यास संबंधित यंत्रणांवर कारवाईचा, इशाराही आयुक्तांनी दिला आहे.

पावसाळ्याच्‍या पार्श्‍वभूमीवर, बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये हिवताप (मलेरिया), डेंगी व तत्‍सम आजारांना प्रतिबंध करण्यासाठी सार्वजनिक आरोग्‍य विभाग व कीटकनाशक विभागाने उपाययोजना हाती घेतल्या आहे. त्‍याचा एक भाग म्‍हणून बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रासाठीच्या डास निर्मूलन समितीची ( Mosquito Abatement Committee ) सभा समितीचे अध्यक्ष तथा महापालिका आयुक्‍त डॉ. इक्बाल सिंह चहल यांच्‍या अध्‍यक्षतेखाली बैठक आज संपन्न झाली. त्याप्रसंगी सदस्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी बोलताना आयुक्त चहल म्हणाले की, ज्‍या यंत्रणांच्‍या हद्दीत पाणी साठवण्‍याच्‍या जागा व टाक्‍या यांचे डास प्रतिबंधक शिल्‍लक आहे. निकामी व भंगार साहित्याची विल्‍हेवाट लावलेली नाही. त्‍यांनी त्‍वरेने कार्यवाही सुरु करावी. ३० एप्रिल २०२२ पर्यंत सर्व कार्यवाही पूर्ण करुन महापालिका प्रशासनास सहकार्य करावे. संबंधितांनी ही कार्यवाही पूर्ण केल्यानंतर त्याची छायाचित्रे व्हॉट्सअप समुहामध्ये पाठविणे आवश्यक असेल. अन्यथा महापालिका कायद्यानुसार त्‍यांच्‍यावर योग्‍य ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

केंद्र तसेच राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग, मध्‍य रेल्‍वे, पश्चिम रेल्‍वे, म्‍हाडा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई विमानतळ, मुंबई पोर्ट ट्रस्‍ट, लष्कर, नौदल, वायूदल, सैन्‍यदल अभियांत्रिकी सेवा, बेस्‍ट, डाक विभाग, एमटीएनएल, बीएसएनएल, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. अशा शासकीय, निमशासकीय यंत्रणांचे मिळून ५१ प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

हेही वाचा -Kolhapur By Election : मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर राजेश क्षीरसागरांची प्रतिक्रिया; म्हणाले, मी नाराज नव्हतो मात्र...

ABOUT THE AUTHOR

...view details