महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Water supply Brake: मालाड आणि कांदिवलीत या दिवशी पाणीपुरवठा बंद.. - मालवणी

मालाड (पश्चिम) (malad west) विभागातील मालवणी (Malvani) येथे जलवाहिन्यांची जोडणी व झडप बसवण्याचे काम केले जाणार आहे. १७ ऑक्टोबर रात्री १० ते १८ ऑक्टोबर रात्री १० या कालावधीत हे काम केले जाणार आहे.

Water supply Brake
Water supply Brake

By

Published : Oct 17, 2022, 5:07 PM IST

मुंबई: मालाड (पश्चिम) (malad west) विभागातील मालवणी (Malvani) येथे जलवाहिन्यांची जोडणी व झडप बसवण्याचे काम केले जाणार आहे. १७ ऑक्टोबर रात्री १० ते १८ ऑक्टोबर रात्री १० या कालावधीत हे काम केले जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत मालाड (पश्चिम) विभागातील मढ, मालवणी, जनकल्याण नगर, मनोरी, गोराई तसेच कांदिवली (पश्चिम) या विभागातील छत्रपती शिवाजी महाराज संकुल आणि न्यू म्हाडा परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

२४ तास पाणी नाही:बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मालाड (पश्चिम) विभागातील मार्वे मार्ग येथे नव्याने ७५० मिलीमीटर व अस्तित्वात असलेल्या ६०० मिलीमीटर व्यासांच्या जलवाहिन्यांच्या जोडणीचे व ६०० मिलीमीटर मध्यवर्ती झडप बसविण्याचे काम सोमवार १७ ऑक्टोबर रात्री १० वाजेपासून मंगळवार १८ ऑक्टोबर रात्री १० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत या परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे.

पाणीसाठा करून ठेवा: बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने संबंधीत परिसरातील नागरिकांना पाणीकपातीपूर्वीच पाण्याचा आवश्यक साठा करुन कपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details