मुंबई -मुंबईत भायखळा येथील ई विभाग कार्यालयाच्या हद्दीत पाणीपुरवठा योग्यरित्या व योग्य प्रमाणात व्हावा यासाठी जुनी जलवाहिनी काढण्यात येणार आहे. ते काम शुक्रवार आणि शनिवारी असे दोन दिवस केले जाणार आहे. त्याच पार्श्वभुमीवर ए, बी, ई, एफ दक्षिण व एफ उत्तर या वॉर्डमधील काही विभागांमधील पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात ( Mumbai Water Supply Cut Off ) आली आहे. यावेळी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहनही पालिकेने केले आहे.
ई विभागातील बॅरिस्टर नाथ पै जंक्शन म्हातारपाखाडी तसेच डॉकयार्ड मार्गालगत असलेली १४५० मिलीमीटर व्यासाची जुनी जलवाहिनी निष्कासित करण्याचे काम शुक्रवार, दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजेपासून शनिवार, दिनांक २२ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवार दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजेपासून शनिवार, दिनांक २२ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० पर्यंत ए, बी, ई, एफ दक्षिण व एफ उत्तर या विभागांमधील खालील नमूद परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तर एफ दक्षिण व एफ उत्तर या विभागांमधील इतर काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
या विभागात पाणी बंद
- ए विभागात नेव्हल डॉकयार्ड सप्लाय - (दुपारी १.४० ते ४ वाजता) आणि (रात्री ९.४० ते मध्यरात्री २.४५ वाजता) - सेंट जॉर्ज हॉस्पिटल, पी. डिमेलो मार्ग, रामगड झोपडपट्टी, आर. बी. आय., नेव्हल डॉकयार्ड, शहीद भगतसिंग मार्ग, जी. पी. ओ. जंक्शन पासून रिगल सिनेमापर्यंत दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार.
- बी विभागात बाबुला टँक झोन - (पहाटे ४ ते सकाळी ६.२५ वाजता) - मोहम्मद अली मार्ग, इब्राहिम रहिमत्तुला मार्ग, इमामवाडा मार्ग, इब्राहिम मर्चंट मार्ग, युसूफ मेहेर अली मार्ग दिनांक २२ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार.
- डोंगरी B झोन - (पहाटे ४.३० ते सकाळी ६.१५ वाजता) - नूरबाग, रामचंद्र भट मार्ग, सॅम्युअल स्ट्रिट, केशवजी नाईक मार्ग, नरसी नाथा रस्ता – दिनांक २२ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार
- डोंगरी A झोन - (सकाळी ८.२५ ते सकाळी १०.०५ वाजता) - उमरखाडी , शायदा मार्ग आणि नूरबाग, डॉ . महेश्वरी मार्ग – दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार
- बी. पी. टी. झोन - (पहाटे ४.२० ते सकाळी ६.२० वाजता) आणि (रात्री ११.३० ते मध्यरात्री १ वाजता) - संपूर्ण बी. पी. टी. झोन, पी. डिमेलो मार्ग – दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार.
- मध्य रेल्वे - (सायंकाळी ७ ते रात्री ८ वाजता)
- रेल्वे यार्ड – दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद
- वाडी बंदर - (सायंकाळी ४.३० ते सायंकाळी ५.३० वाजता) – पी. डिमेलो मार्ग – दिनांक २२ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद
- वाडी बंदर - (सायंकाळी ७.१५ ते रात्री ८.०० वाजता) – पी. डिमेलो मार्ग – दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद
- ई विभाग –नेसबीट झोन (१४५० मिलीमीटर आणि ८०० मिलीमीटर) - (पहाटे ४ ते सकाळी ६.३० वाजता) - ना. म. जोशी मार्ग, मदनपुरा, कामाठीपुरा, एम. एस. अली मार्ग, एम. ए. मार्ग, आग्रीपाडा, टँक पाखाडी मार्ग, क्लेअर रोड, भायखळा (पश्चिम) येथे दिनांक २२ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.
- म्हातारपाखाडी रोड झोन -(सकाळी ६.३५ ते सकाळी ८.१५ वाजता) - म्हातारपाखाडी मार्ग, सेंट मेरी मार्ग, नेसबीट मार्ग, ताडवाडी रेल्वे कम्पाऊंड – दिनांक २२ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.
- डॉकयार्ड रोड झोन - (दुपारी १२.२० ते दुपारी २.५० वाजता) – बॅरिस्टर नाथ पै मार्ग, डिलिमा रस्ता, गणपावडर मार्ग, कासार गल्ली, लोहारखाता, कोपरस्मिथ मार्ग – दिनांक २२ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.
- हातीबाग मार्ग - (दुपारी ३.२० ते सायंकाळी ५ वाजता) – हातीबाग, शेठ मोतिशहा गल्ली, डि. एन. सिंग मार्ग – दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.
- बी. पी. टी. झोन - (पहाटे ४.४५ ते पहाटे ५.५५ वाजता) – बी. पी. टी ., दारुखाना लडाख नगर – दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.
- रे रोड झोन - (सायंकाळी ७ ते रात्री ८.३० वाजता) – बॅरिस्टर नाथ पै मार्ग, मोदी कंम्पाऊंड , ऍटलास मील कम्पाऊंड , घोडपदेव छेद गल्ली १-३ दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद
- माऊंट रोड - (सायंकाळी ७.१५ ते रात्री ९ वाजता) – रामभाऊ भोगले मार्ग, फेरबंदर नाका, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, घोडपदेव नाका, म्हाडा संकुल, भायखळा (पूर्व), शेठ मोतिशहा गल्ली, टी . बी. कदम मार्ग, सावता मार्ग – दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद
- एफ/दक्षिण विभाग –रुग्णालय प्रभाग - (२४ तास पाणीपुरवठा) - के. ई. एम. रुग्णालय, टाटा रुग्णालय, बाई जेरबाई वाडिया रुग्णालय आणि एम. जी. एम. रुग्णालय येथे दिनांक २१ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद.
- अभ्युदय नगर -(मध्यरात्री २.१५ ते सकाळी ६ वाजता) - अभ्युदय नगर, ठोकरसी जीवराज मार्ग – दिनांक २२ जानेवारी २०२२ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद