महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चेंबूर, गोवंडी, मानखुर्द परिसरात गुरुवारी १८ तासांसाठी पाणी पुरवठा बंद! - Mumbai Municipal Corporation

ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयातील इनलेट्स व्हॉल्व्ह बदलण्याचे काम गुरुवारी, २७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून हाती घेण्यात येणार आहे. हे काम २८ जानेवारी रोजी शुक्रवारी पहाटे ४ वाजेपर्यंत पूर्ण होणार आहे. या कालावधीत म्हणजे गुरुवारी सकाळी १० वाजेपासून शुक्रवारी पहाटे ४ वाजेपर्यंत एम पूर्व आणि एम पश्चिम म्हणजेच चेंबूर, मानखुर्द गोवंडी आदी विभागांतील पाणीपुरवठा १८ तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मुंबईत पाणीपुरवठा बंद
मुंबईत पाणीपुरवठा बंद

By

Published : Jan 25, 2022, 7:48 AM IST

मुंबई - मुंबई महानगरपालिकेतर्फे ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयातील इनलेट्स व्हॉल्व्ह बदलण्याचे काम गुरुवारी, २७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून हाती घेण्यात येणार आहे. हे काम २८ जानेवारी रोजी शुक्रवारी पहाटे ४ वाजेपर्यंत पूर्ण होणार आहे. या कालावधीत म्हणजे गुरुवारी सकाळी १० वाजेपासून शुक्रवारी पहाटे ४ वाजेपर्यंत एम पूर्व आणि एम पश्चिम म्हणजेच चेंबूर, मानखुर्द गोवंडी आदी विभागांतील पाणीपुरवठा १८ तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पाण्याचा आवश्यक साठा करा -

ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयाचे काम पालिकेच्या जलविभाग हाती घेणार आहे. हे काम गुरुवारी, २७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेपासून दुस-या दिवशी शुक्रवारी पहाटे ४ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत या भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. चेंबूर, गोवंडी तसेच मानखुर्द परिसरात पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने रहिवाशांना केले आहे.

या विभागात पाणी पुरवठा बंद -

एम/पूर्व विभाग -
टाटानगर, गोवंडी स्थानक मार्ग, देवनार महानगरपालिका वसाहत, लल्लूभाई कंपाऊंड; लल्लूभाई कंपाऊंड, हिरानंदानी इमारत, जॉन्सन जेकब मार्ग (ए, बी, आय, एफ सेक्टर), एसपीपीएल इमारती, म्हाडा इमारती, महाराष्ट्र नगर; प्रभाग क्रमांक १४४ - देवनार गाव रस्ता, गोवंडी गांव, व्ही. एन. पूरव मार्ग, बीकेएसडी मार्ग, दूरसंचार कारखाना परिसर, मंडाला गांव, मानखुर्द नौदल, संरक्षण क्षेत्र, मानखुर्द गांव, गोवंडी स्थानक मार्ग, टि. आय. एफ. आर. वसाहत; प्रभाग क्रमांक १४५ - सी-सेक्टर, डी-सेक्टर, ई-सेक्टर, जी-सेक्टर, एच-सेक्टर, जे-सेक्टर, के-सेक्टर, कोळीवाडा ट्रॉम्बे, कस्टम मार्ग, दत्त नगर, बालाजी मंदीर मार्ग, पायलीपाडा, चिता कॅम्प ट्रॉम्बे; प्रभाग क्रमांक १४६ - देवनार फार्म मार्ग, बोरबादेवी नगर, बी. ए. आर. सी. फॅक्टरी, बी. ए. आर. सी वसाहत

एम/पश्चिम विभाग -
साईबाबा नगर आणि श्रमजीवी नगर; सुभाष नगर, चेंबूर गावठाण, स्वस्तीक पार्क, सिद्धार्थ वसाहत, सुमन नगर, घाटला अमर नगर, मोती बाग खारदेव नगर, वैभव नगर, मैत्री पार्क, अतूर पार्क; चेंबूर कॅम्प, युनियन पार्क लाल वाडी, लाल डोंगर

ABOUT THE AUTHOR

...view details