महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Rain : काय तो पाऊस, काय ते पाणी; मुंबईच्या धरणांमध्ये ७ दिवसात महिनाभराचा पाणीसाठा वाढला! - धरणात पाणीसाठा वाढला

जूनच्या अखेरीपासून मुंबई आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडला आहे. यामुळे गेल्या ७ दिवसात ८.९२ टक्के म्हणजेच १,२९,१२३ दशलक्ष लिटर पाण्याची वाढ झाली आहे. ८.९२ टक्के म्हणजेच १,२९,१२३ दशलक्ष लिटर पाणीसाठा वाढला आहे.

mumbai rain
मुंबईतील पाऊस

By

Published : Jul 7, 2022, 4:28 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मात्र जूनच्या अखेरीपासून मुंबई आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडला आहे. यामुळे गेल्या ७ दिवसात ८.९२ टक्के म्हणजेच १,२९,१२३ दशलक्ष लिटर पाण्याची वाढ झाली आहे. ८.९२ टक्के म्हणजेच १,२९,१२३ दशलक्ष लिटर पाणीसाठा वाढला आहे. सात दिवसात ३७ दिवसांच्या पाण्याची वाढ झाली आहे.

मुंबईत १० टक्के पाणी कपात -मुंबईला वर्षाला १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या पावसामुळे हा पाणीसाठा जमा होत होता. मात्र यंदा जून महिन्यात समाधान कारक पाऊस पडलेला नाही. ११ जूनला पाऊस सुरु झाला. त्यानंतर पावसाने पाठ फिरवली. यामुळे १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. २९ जूनपासून पुन्हा पावसाने मुंबईत हजेरी लावलेली आहे. २ जुलैपर्यंत पाऊस पडला. रविवारी पावसाने विश्रांती घेतली होती. ४ जुलै पासून गेले तीन दिवस मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.

७ दिवसात ३७ दिवसांच्या पाण्याची वाढ -२९ जूनला धरणामध्ये १ लाख ४७ हजार ६ दशलक्ष लिटर म्हणजेच १०.१६ टक्के पाणीसाठा होता. गेल्या ७ दिवसात पाऊस पडल्याने २ लाख ७६ हजार १२९ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. काल एका दिवसात १२ दिवसांचा (४३, ३८५ दशलक्ष लिटर) पाणी साथ जमा झाला आहे. सध्या धरणांमध्ये १९.०८ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या ७ दिवसात ८.९२ टक्के म्हणजेच १,२९,१२३ दशलक्ष लिटर पाण्याची वाढ झाली आहे. मुंबईला ३८५० दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची रोज गरज भासते. मात्र सध्या १० टक्के पाणी कपात असल्याने ३४६५ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जात आहे. यानुसार धरणांमध्ये ७ दिवसात ३७ दिवसांच्या पाण्याची वाढ झाली आहे. हा पाणीसाठा पुढील ७९ दिवस (२ महिने १९ दिवस) पुरेल इतका झाला आहे.

रोज ३८५० दशलक्ष लिटर पाण्याची गरज -मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या ७ धरणांतून दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. ठाणे, भिवंडी महानगरपालिकेला दररोज १५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येत असून पाऊस आणखी लांबल्यास मुंबईकरांसह ठाणे, भिवंडीकरांनाही दीर्घकालीन पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे.

प्रत्येक आठवड्याला आढावा -मुंबईमध्ये पाऊस पडला नसल्याने धरणामध्ये १० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. प्रत्येक आठवड्याला पाणीसाठा किती आहे याचा आढाव घेतला जाईल. पुढील महिन्यापर्यंत पाऊस चांगला पडला तर पाणी कपातीचे प्रमाण कमी केली जाईल. पाऊस पडला नाही तर पाणी कपातीमध्ये वाढही केली जाऊ शकते. धरणातील पाणीसाठा किती आहे त्याकडे आमचे लक्ष आहे. पाणी साठयाच्या नुसार पुढील उपाययोजना आणि नियोजन केले जाईल अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून देण्यात आली आहे.

पाणीसाठा

२९ जूनला १,४७,००६ दशलक्ष लिटर (१०.१६ टक्के)

जुलैला पाणीसाठा
२०२२ मध्ये २,७६,१२९ दशलक्ष लिटर (१९.०८ टक्के)
२०२१ मध्ये २,६६,८४८ दशलक्ष लिटर (१८.४४ टक्के)
२०२० मध्ये २,०४,५२१ दशलक्ष लिटर (१४.१३ टक्के)


धरणातील पाणीसाठा -
मोडक सागर ५६,१३७ दशलक्ष लिटर
तानसा ३०,५०४ दशलक्ष लिटर
मध्य वैतरणा २५,१७४ दशलक्ष लिटर
भातसा १,४८,४६२ दशलक्ष लिटर
विहार ११,२३९ दशलक्ष लिटर
तुलसी ४,६१५ दशलक्ष लिटर

ABOUT THE AUTHOR

...view details