मुंबई:मुंबईला पाणीपुरवठा Water Supply To Mumbai केले जाणारे पाणी हे भारतातील सर्वात स्वच्छ पाणी आहे. विशेष म्हणजे मुंबईबाहेर १०० किलोमीटर हुन अधिक अंतरावर असलेल्या धरणांमधून हे पाणी मुंबईत आणले जाते. इतक्या अंतरावरून पाणीपुरवठा Water Supply To Mumbai केला जात असताना पाणी स्वच्छ कसे राहील, यासाठी पालिकेच्या जल विभागाचा Municipal Water Department प्रयत्न असतो. पालिकेच्या प्रयत्नांमुळेच १ कोटी ३० लाख नागरिकांना रोज ३८५० दशलक्ष लिटर स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
१०० किलोमीटर लांबीहून पाणीपुरवठा मुंबईला भातसा, मोडक सागर, तानसा, वैतरणा, मध्य वैतरणा, तुळसी, विहार आदी धरणांमधून दिवसाला ३८५० दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा केला जातो. हा पाणीपुरवठा तानसा आणि मोडक सागर या दोन लाईनमधून केला जातो. मुंबईपासून तानसा धरणाचे अंतर हे १०६ किलोमीटर आहे, तर मोडक सागर धरणाचे अंतर १२० किलोमीटर इतके आहे. जलस्रोतांमधील पाणी शुध्दीकरणाकरीता पांजरापूर (१३६५ द.ल.लि. प्रतिदिन), भांडुप संकुल (२८१० द.ल.लि. प्रतिदिन) आणि विहार (१० द.ल.लि. प्रतिदिन) आणि तुळशी (१८ द.ल.लि. प्रतिदिन) येथे आणले जाते. अशुध्द पाणी वाहुन आणणारया जलवाहिन्यांना प्राथमिक स्तर व्यवस्था ( Primary System ) म्हणतात. जी सुमारे ४०० किलोमीटर एवढ्या लांबीची आहे. प्राथमिक स्तर व्यवस्था ( Primary System ) मध्ये सुमारे ४३ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्यांचा समावेश आहे.
असे होते पाणी शुद्ध जल शुध्दीकरण केंद्रामध्ये पाणी पोहचविल्यानंतर त्यामध्ये प्रथम (पीएसी) पॉली एल्युमिनियम क्लोराईड मिसळले जाते. हे पीएसी मिश्रीत पाणी मोठ मोठ्या टाक्यांमधुन नेऊन त्यास संय होण्यासाठी अवधी दिला जातो. यामुळे पीएसीची प्रक्रिया पूर्ण होऊन जड झालेला गाळ, धुलीकण या मोठाल्या टाक्यांच्या तळाशी बसतात. हा गाळ सतत टाक्यांमधून बाहेर काढला जात असतो. नंतर हे पाणी पूर्णतः गाळण्यासाठी रेतीचा, वाळूचा थर असलेल्या टाक्यांमधुन (रॅपिड सैंड फ़िल्टर्स) मधून नेण्यात येते. पूर्णतः गाळलेले, शुध्द झालेले पाणी फिल्टर बेडच्या तळातून काढून घेवून निर्जंतुकीकरणासाठी पुढे नेण्यात येते. शुध्द पाणी बरयाच लांबवर वाहून नेण्याचे असल्याने निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीनचा वापर केला जातो. निर्जंतुकीकरण केलेले पाणी एका जलाशयात साठवून पुढील वितरणासाठी शहरात ठिकठिकाणी असलेल्या सेवा जलाशयापर्यंत पोहोचविले जाते. जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणित केलेल्या मानकांनुसार जलशुद्धीकरण केले जाते. शुध्द पाण्याचा गढूळपणा पूर्ण वर्षभर 90.3 NTU वा त्यापेक्षा कमी असतो व ' क्लोरीनचे ग्राहकाच्या ठिकाणचे प्रमाण ०.२ PPM एवढे असते अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता पुरुषोत्तम मालावडे यांनी दिली.