महाराष्ट्र

maharashtra

Eknath Shinde Help to Warkari : जखमी वारकऱ्यांवर स्वखर्चाने करणार उपचार-मुख्यमंत्र्यांची माहिती

By

Published : Jul 7, 2022, 10:55 AM IST

अपघातातील जखमी वारकऱ्यांच्या (Warkari) मदतीसाठी धावून आले 'एकनाथ', स्वखर्चाने उपचार करणार असे निर्देश मिरज येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी दिले.

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी सांगली येथील रस्ते अपघातात (Road accident) जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करावे असे निर्देश मिरज येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले, तसेच स्वखर्चाने उपचार करणार असल्याचे सांगत त्याना प्रचिती देऊन मदतीचा हात पुढे केला आहे.

मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी फाट्याजवळ आज एक भीषण अपघात (Terrible Accident) घडला. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पीक अप जीप घुसून झालेल्या या अपघातात 14 वारकरी(Warkari) जखमी झाले. जखमींना तातडीने मिरज सिव्हिल आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांकडून वारकऱ्यांची विचारपूस-दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मिरजेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांना फोन लावून या वारकऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि लागेल तो खर्च उचलण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली. या रस्ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. त्यांना लागतील ते सर्व उपचार देऊ असे डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. आषाढी वारी (Ashadi Wari) अगदी 2-3 दिवसांवर येऊन ठेपलेली असताना घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे यंदाच्या वारीला गालबोट लागलं होतं. मात्र वारकऱ्यांच्या मदतीला खुद्द 'एकनाथ' धावून आल्याने सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी तत्पर असलेला मुख्यमंत्री अशी शिंदे यांची ओळख नव्याने अधोरेखित झाली आहे.

असा घडला होता अपघात- पंढरपूरकडे पायी निघालेल्या दिंडीत भरधाव पिकअप जीप गाडी घुसन 16 वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. कवठेमहाकाळ तालुक्यातील मिरज- पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी येथे हा भीषण अपघात ( Sangli Warkari Dindi Accident ) घडला आहे. जखमी वारकऱ्यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कापसी आणि माणगाव परिसरातील संत सदगुरू बाळू मामा दिंडी पंढरपूरकडे निघालेली असताना, या दिंडीला मंगळवारी सायंकाळी अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामध्ये 16 वारकरी जखमी झाले आहेत.

हेही वाचा:Gajanan Maharaj Palkhi : वैष्णव पताका हाती घेऊन संत गजानन महाराज पालखी विठ्ठल भेटीला रवाना; सोलापुरात भव्य स्वागत

ABOUT THE AUTHOR

...view details