महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोस्टल रोड विरोधात वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांचा मतदानावर बहिष्कार

पालिकेकडून उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची कोणतीच अंमलबजावणी होत नाही. यामुळे वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

निषेधाचा फलक

By

Published : Apr 20, 2019, 1:48 PM IST

मुंबई- सागरी किनारा मार्ग प्रकल्प (कोस्टल रोड) ला विरोध असलेल्या वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांनी लोकसभा निवडणुकीवर निषेध म्हणून बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीवर बहिष्कार घालत असल्याचे फलक वरळी कोळीवाडा परिसरात झळकत आहेत.

कोस्टल रोडसाठी समुद्र किनाऱ्यालगत २०० ते ५०० मीटर परिसरात भराव टाकला जात आहे. त्यामुळे मच्छिमार समाज व त्यांचा व्यवसाय देशोधडीला लागणार आहे. तसेच पावसात वरळी कोळीवाड्यात समुद्राचे पाणी घरात शिरून गाव नामशेष होईल, अशी भीती कोळी बांधवांना आहे. एकीकडे उच्च न्यायालयाने पालिकेला त्यावर उपाय योजना व सूचना करण्याचे निर्देश दिलेत. मात्र, राजकीय पक्षांच्या महत्त्वकांक्षेपोटी व निवास योजनेच्या नावाखाली पर्यावरण व मुंबईचा मुळ नागरिक असलेला कोळी बांधवांना नेस्तनाबूत केले जात असल्याचे कोळी बांधवांचे म्हणणे आहे.

पालिकेकडून उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची कोणतीच अंमलबजावणी होत नाही. यामुळे वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसे निषेध व बहिष्काराचे फलक वरळी कोळीवाडा परिसरात लावण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details