मुंबई -मला माझे शारीरिक वजन कमी करायचे आहे, मात्र त्याचबरोबर सामाजिक वजन वाढवायचे आहे, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात म्हटले. राज ठाकरे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेवून हे वक्तव्य केले की काय, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. डॉ. संजय बोरुडे यांच्या जनरेशन एक्स एल पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईमध्ये पार पडला. यावेळी राज यांनी सदर विधान केले. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले आणि बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ हे देखील उपस्थित होते.
हेही वाचा -रेल्वे हद्दीतील नाले सफाईचे काम समाधानकारक, पालिका अन् रेल्वे अधिकाऱ्यांचा संयुक्त पाहणी दौरा
महाराष्ट्रत रहात असाल तर मराठी बलावे -मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक वेळा मराठीच्या मुद्द्यांवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापवले आहे. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जॅकी श्रॉफ यांनी देखील आपल्या भाषणामध्ये महाराष्ट्रात रहात असाल तर मराठी बोलायला पाहिजे, असे म्हटले. त्यांनी भाषणाची सुरुवात देखील मराठीतून केली. तसेच, आईवडिलांनी लहान मुलांच्या जीवनशैलीवर लक्ष दिले पाहिजे जेणेकरून त्यांना कुठल्या आजाराचा सामना करावा लागणार नाही. आताचे मुले शारीरिक दृष्ट्या कमी व्यायाम करतात, पहिल्यासारखे कबड्डी खो-खो यासारखे शारीरिक व्यायाम होणारे खेळा जवळपास कमी होत चालले आहेत. त्याचा परिणाम शरीरातील पचनक्रियेवर होतो आणि त्यानंतर त्याचे रुपांतर विविध आजारांमध्ये होते. त्यामुळे, पालकांनी देखील याकडे लक्ष दिले पाहिजे, असे जॅकी श्रॉफ यांनी म्हटले.
या दोन गोष्टींवर ताबा ठेवावा - सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी सांगितले की, पाच इंद्रियांवर ताबा ठेवण्यापेक्षा जीभ आणि बोलण्यावर ताबा ठेवला तर त्यांच्या जीवनात कुठलेही संघर्ष आणि आपत्ती येत नाही. ती मग कोणतीही स्वरुपाची असो. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीविरोधात विचार न करता काही बोलून गेले, तर त्यामुळे तुमच्या आणि त्या व्यक्तीमध्ये वाद होण्याची देखील शक्यता असू शकते. त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर देखील होतो. त्याचप्रमाणे तुम्ही खाण्यावर नियंत्रण ठेवू शकत नसणार तर तुम्हाला विविध आजार देखील होऊ शकतात. फास्टफूडचा वापर न करता घरचे जेवण, भाकरी, डाळ, भात, पोळी यासारखे साधे जेवण पचन क्रियेसाठी देखील चांगले असते. स्वतःवर कंट्रोल ठेवले तर लठ्ठपणा किंवा इतर आजारांपासून दूर राहता येते. या संदर्भातील पुस्तक संजय बोराडे यांनी प्रकाशित केले आहे, त्यामुळे लोकांनी पाच इंद्रियांपेक्षा दोन गोष्टींवर जर ताबा ठेवला तर आयुष्य सुखमय होणार, असे प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी यावेळी म्हटले.
लहान मुलांमध्ये लठ्ठपणा आला तर विविध आजार त्यांना जडतात. 2015 मध्ये लठ्ठपणाला लहान मुलांमधील आजार म्हणून घोषित केले गेले आहे.जागरुकता निर्माण करण्यासाठी मी हे पुस्तक लिहिले आहे आणि राज ठाकरे, आशा भोसले, जॅकी श्रॉफ यांच्याशी जवळचे संबंध असल्याने त्यांना या कार्यक्रमात बोलावले होते. हे सर्व प्रभावी व्यक्तिमत्व आणि समाजात लोकप्रिय आहे. त्यांच्यामुळे समाजात जागृकता निर्माण होईल, असे मला वाटते, असे जनरेशन एक्स एल या पुस्तकाचे लेखक बोरुडे म्हणाले.
हेही वाचा -Nawab Malik Money laundering Case : मलिकांनी हसीना पारकरला 55 लाख रोख दिले, ईडीची आरोपपत्रात माहिती