मुंबई - महानगरात सुरू असलेल्या धुवांधार पावसामुळे भांडुप पश्चिमेकडील प्रभाग ११३ मधील पवार चाळ व गावकर चाळ त्याचप्रमाणे गावदेवी मंदिराजवळील शामलाल चाळ परिसरात आधारभिंतीचा भाग कोसळल्याची घटना घडल्या आहेत. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे.
भांडुपमध्ये आधारभिंत कोसळली, जीवितहानी नाही - भांडूप भिंत कोसळली बातमी
मागच्या ४८ तासांमध्ये मुंबईला पावसाने झोडपून काढले. या तूफान बरसलेल्या पावसामध्ये अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याबरोबरच झाडांची पडझड आणि घरात पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या. भांडुपमध्ये अनेक भागामध्ये संरक्षण भिंतींना तडे जात, त्या कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
भांडुपमध्ये आधारभिंत कोसळली