मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्य निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रांवर जोरदार तयारी करण्यात आली. मात्र, काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे.
वरळी मतदार संघातील 52 चाळ येथील 62 नंबर मतदान केंद्रातील 3 ईव्हीएम मशीन बंद पडल्याने त्या बदलण्याचे काम या केंद्रात सुरू झाले आहे.
लातूर
निलंगा तालुक्यातील अंबुलगा बूथ क्र.249 वर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या दीड तासापासून मतदान प्रक्रिया बंद आहे. काही ठिकाणी महिला मतदार मतदान न करताच घरी निघून गेल्याचे चित्र आहे.
1132 पैकी 449 मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच जळकोट तालुक्यातील मरसंगवी गावातील बूथ क्र.104 वरील मशीन काम करत नसल्याने एक वाजल्यापासून मतदान बंद आहे. मशीनच्या केबल काम करत नसल्याने मतदान बंद करण्यात आल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.
मरसंगवी गावात एकूण 3 मतदान केंद्र असून, जिल्हा परिषद शाळेत असलेले मतदान केंद्र क्र.104 वरील मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान थांबले. मशीनमध्ये बिघाड होण्यापूर्वी 300 मतदारांनी त्यांचा हक्क बजावला होता. या केंद्रावर एकूण 956 नोंदणीकृत मतदान आहे. तात्काळ मशीन दुरुस्त करण्यासाठी अधिकाऱ्यांची धडपड सुरू आहे.
सांगली
इस्लामपूर(283) विधानसभा मतदारसंघातील साखराळे येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बुथवरील ईव्हीएम मशीन 45 मिनिटे बंद पडल्याने नागरिकांची गैरसोय झाली. यानंतर जयंत पाटील यांनी प्रशासनाकडे वाया गेलेली वेळ वाढवून देण्याची मागणी केल्यानंतर प्रशासनाने नकार दिला आहे.
हे चुकीचे असून मतदान प्रक्रिया ही लोकांच्या सोई साठी आहे; की सरकारच्या सोईसाठी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच दुपारनंतर पाऊस पडण्याच्या अंदाज वर्तवण्यात आल्याने मतदान कमी होऊ शकते. यामुळे प्रशासनाने वेळ वाढवून देण्याची मागणी जयंत पाटील यांनी केली.
उस्मानाबाद
पावसातही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लोक येत आहेत. मात्र, ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदान प्रक्रिया रेंगाळी असून, उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघातील डिकसळ येथे मतदारांना वाट पाहावी लागली. या मतदान केंद्रावर 660 मतदार संख्या असलेले बूथ क्रमांक 55 मधील मतदान यंत्र अर्धा तास बंद होते. काही वेळानंतर मशीन पुन्हा सुरू करण्यात आल्याने मतदान सुरळीत झाले आहे.
अमरावती
चांदूर-रेल्वे तालुक्यामधील येरड मतदान केंद्रात ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने तब्बल दीड तास मतदान बंद होते. यामुळे मतदारांच्या केंद्रावर रांगा लागल्या होत्या. उशिरा मतदान सुरू झाल्याने वेळ वाढवून देण्याची मागणी मतदारांनी केली आहे.
जालना