मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नुकतेच सहकुटुंब केदारनाथ मंदिरात जाऊन महादेवाचे आणि बद्रीनाथ येथे जाऊन भगवान विष्णूचे दर्शन घेतले. राज्याला विकासाच्या पथावर व जनतेला सुखसमृद्धी लाभो अशी प्रार्थना यांनी केली.
जनतेच्या सुखासाठी मंत्री जयंत पाटील केदारनाथाच्या दर्शनाला - Minister Jayant Patil visits Kedarnath
राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नुकतेच सहकुटुंब केदारनाथ मंदिरात जाऊन महादेवाचे आणि बद्रीनाथ येथे जाऊन भगवान विष्णूचे दर्शन घेतले. राज्याला विकासाच्या पथावर व जनतेला सुखसमृद्धी लाभो अशी प्रार्थना यांनी केली. या देवदर्शनाचे फोटो मंत्री जयंतराव पाटील यांनी ट्विट केले आहेत.
या देवदर्शनाचे फोटो मंत्री जयंतराव पाटील यांनी ट्विट केले आहेत.
जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये हर हर महादेव! संपूर्ण कुटुंबासह बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्राचीन अशा केदारनाथ मंदिरात जाऊन महादेवाचे आणि बद्रीनाथ येथे भगवान विष्णूचे दर्शन घेतले. विशाल पर्वतांनी सामावून घेतलेल्या, निसर्गाचे वरदान असलेल्या या भूमीचे पावित्र्य मनाला सकारात्मकता देऊन गेले असे म्हटले आहे.
सध्या देवदर्शन करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची चढाओढ चालली आहे. अशात कोणताही गाजावाजा न करता मंत्री जयंतराव पाटील यांनी केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिराला भेट दिली आहे.