मुंबई - भंडारा येथे सरकारी रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभुमीवर मुंबईमधील हजाराहून अधिक असलेल्या सरकारी, खासगी रुग्णालये, प्रसूती गृहे, दवाखाने यांचे फायर ऑडिट केले जात आहे. त्यात सुमारे १२५ रुग्णालयांनी अग्नी सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचे उघड झाले आहे. अग्नी सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाते. मात्र मुंबईमधील रुग्णालयांनी अग्नी सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले तरी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही. त्यांच्याकडून अग्नी सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करून घेण्यावर भर देणार असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख कैलास हिवराळे यांनी दिली.
एक हजार रुग्णालयांना नोटीस -
मागील महिन्यात भंडारा येथील सरकारी रुग्णालयात आग लागली होती. या आगीत नवजात १० बालकांचा मृत्यू झाला. त्याची दखल घेत मुंबईत असा प्रकार घडू नये म्हणून महापालिकेने शहरातील १३०० पैकी एक हजाराहून अधिक सरकारी, खासगी रुग्णालये, प्रसूती गृहे, दवाखाने यांनी फायर ऑडिट केले आहे कि नाही, याची चौकशी सुरू केली. या सर्वाना अग्नीसुरक्षा नियमांची अंमलबजावणी करण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. शहरातील ६३९ रुग्णालयांमध्ये काही किरकोळ दुरुस्ती करण्याचे आवश्यक असल्याचे या तपासणीतून समोर आले. रुग्णालयांच्या रचनेसह सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर धोके असल्याचे ४० खासगी रुग्णालयांमध्ये आढळले, तर ३४२ रुग्णालयांमध्ये आग लागल्यास इमारतीबाहेर पडण्याच्या रस्त्यांमध्ये अडगळीच्या सामानामुळे जाण्यास रस्ता उपलब्ध नसणे, आग विझविण्याची साधने उपलब्ध नसणे किंवा असल्यास त्यांची मुदत संपलेली असणे इत्यादी धोके दिसून आले आहेत. यामुळे मुंबईतही रुग्णालयांना आग लागल्यास भंडाराची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भंडारा आगीनंतर मुंबई महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार मुंबईमधील सरकारी, पालिकेची, खासगी रुग्णालये, प्रसूतीगृहे आदीची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत सुमारे १ हजार ते ११०० रुग्णालयांना नोटीस देण्यात आल्या आहेत. नोटीस दिल्यावर या रुग्णालयांची प्रयत्क्ष पाहणी करण्यात आली. पाहणीनंतर ज्यांच्याकडे फायर सेफ्टी आहे पण कंप्लायन्स नाही, फायर सेफ्टी आहे कंप्लायन्स पण आहेत पण सी फॉर्म नाही, फायर सेफ्टी आणि कंप्लायन्स हे दोन्ही नाहीत असे तीन भाग करण्यात आले आहेत. या पाहणी दरम्यान मुंबईमधील १२५ रुग्णालयांकडे अग्नी सुरक्षा यंत्रणाच नसल्याचे समोर आले आहे. अग्नी सुरक्षा नसलेल्या छोट्या रुग्णालयांना आम्ही स्वत: अग्निशमन यंत्रणा पुरवून भक्कम करणार आहोत. तर ज्या मोठ्या रुग्णालयांकडे ही यंत्रणा नाही त्यांना यंत्रणा कार्यरत करण्यासाठी भाग पाडणार असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख कैलास हिरवाळे यांनी दिली.
मुंबईमध्ये या आधी लागलेल्या आगी -