मुंबई -कोविड प्रतिबंधक नियमावलीचे पालन होत नसल्याबद्दल आज महानगरपालिकेने मालाड येथील डी मार्ट सिल केले आहे. संबंधीत व्यवस्थापनाला नोटीस देऊन तीन दिवसात स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. साथ नियंत्रण कायदा तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून या स्टोअरचे परवान रद्द होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील डी मार्ट मध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन, स्टोअर केले सील - d mart seal
कोविड नियमांचे पालन करताना स्टोअर मध्ये जास्तीत जास्त 150 व्यक्ती उपस्थित राहाणे बंधनकारक होते.मात्र,पालिकेच्या पाहणीत तब्बल 600 च्या आसपास व्यक्ती स्टोअर मध्ये उपस्थित होत्या. मुंबईत आजही कोविड प्रतिबंधक नियमावली नुसार लॉकडाऊन लागू आहे. त्यात,अत्यावश्यक सेवेचे व्यवसाय शनिवारी रविवारीही करण्याची परवानगी आहे.
![मुंबईतील डी मार्ट मध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन, स्टोअर केले सील मुंबईतील डी मार्ट केले सील](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12566402-731-12566402-1627195385761.jpg)
कोविड नियमांचे पालन करताना स्टोअर मध्ये जास्तीत जास्त 150 व्यक्ती उपस्थित राहाणे बंधनकारक होते.मात्र,पालिकेच्या पाहणीत तब्बल 600 च्या आसपास व्यक्ती स्टोअर मध्ये उपस्थित होत्या. मुंबईत आजही कोविड प्रतिबंधक नियमावली नुसार लॉकडाऊन लागू आहे. त्यात,अत्यावश्यक सेवेचे व्यवसाय शनिवारी रविवारीही करण्याची परवानगी आहे. मात्र,नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी तसेच दुकानात येणाऱ्या ग्राहकांनाही नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे.
कोरोना नियमांचे उल्लंघन
मालाड पश्चिमेकडील लिंक रोडवरील या स्टोअरमध्ये हे सर्व नियम पायदळी तुडवले जात असल्याचे पालिकेच्या तपासणीत आढळले. कर्मचाऱ्यांनी विशेषत: बिल कांऊटर वरील कर्मचाऱ्यांनी मास्क व हातमोजे वापरले नव्हते. तसेच,कर्मचारी,ग्राहक वावरत असताना सुरक्षित अंतर पाळले जात नसल्याचे आढळून आले. एकाच वेळी गर्दी झाल्याचे दिसत होते. यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे पालिकेच्या पी उत्तर विभागा कार्यालयामार्फत सांगण्यात आले. कोविड प्रतिबंधक नियमावलीचे पालन होत नसल्याचे लक्षात आल्यावर पालिकेच्या पुढील आदेशापर्यंत हे स्टोअर सिल करण्यात आले आहे. तसेच,नियमभंग प्रकरणी परवाना कायमस्वरुपी का रद्द केले जाऊ नये याबाबत स्पष्टीकरण करण्यासाठी पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांनी नोटीस पाठवली आहे.