मुंबई - राज्याच्या विधानसभेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. पुढिल महिन्यात 21 ऑक्टोबरला मतदान आणि 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्याचे मंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्या सोबत बातचीत केली असता, त्यांनी जनतेचा आशीर्वाद आम्हाला मिळणार. राज्यात भाजप महायुतीचेच सरकार येईल आणि निवडणीक आम्ही जिंकू, असे म्हटले आहे.
जनतेचा आशिर्वाद आम्हाला मिळणार असे, मंत्री विनोद तावडे यांनी म्हटले आहे राज्यात भाजप, शिवसेना व इतर घटक पक्षांसोबत ही निवडणूक मोठ्या संख्येने आम्ही जिंकू असा विश्वास भाजप नेते विनोद तावडे यांनी दाखवला आहे. भाजप सेना युती होणार असून आम्हाला जनतेचा आशीर्वाद असल्याचे विनोद तावडे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... शिवसेना ५० टक्केच्या फॉर्म्युलावर ठाम, भाजप-सेना जुळे भाऊ - संजय राऊत
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महायुतीचं सरकार पुन्हा येईल
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची टिम राज्यातील 8 कोटी 94 लाख मतदारांपर्यंत सरकारने जनतेसाठी काय केले, ते पोहचवेल. आगामी काळात जनतेसाठी काय करणार हे सांगेल. जनतेचा आशिर्वाद देखील आम्हाला मिळेल आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महायुतीचं सरकार पुन्हा येईल., अशी प्रतिक्रीया विनोद तावडे यांनी दिली आहे.
एका महिन्यात सर्व उमेदवारांपर्यंत पोहोचणार
पुढच्या एक महिन्यात सर्व मतदारांपर्यंत पोहचणार. मागील 15 वर्षात जे झाले नाही ते मागील पाच वर्षांत झाल्याचे जनतेला सांगणार. तसेच पुढील पाच वर्षात काय काम करणार हे देखील जनतेला सांगणार, असे तावडे यावेळी म्हणाले. तसेच भाजप महायुती हि किमान 220 चा टप्पा पार करेल, असेही तावडे म्हणाले आहेत.
हेही वाचा... '220 प्लस जागा निवडूण येतील; युतीची चर्चा अंतिम टप्प्यात'
राज्याच्या तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहे. त्यापूर्वी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असल्याने शनिवारी पासून महाराष्ट्रात आचारंसहिता लागू करण्यात आली आहे. 21 ऑक्टोबरला राज्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर करण्यात येतील. त्यामुळे महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी नवे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सद्य मितीस महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.