मुंबई : शिवसेनेतील बंडखोरीनंतर ( After Rebellion in Shiv Sena ) शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार तब्बल महिनाभराने होत आहे. मुख्यमंत्री शिंदे ( Chief Minister Shinde ) यांच्यासोबत गेलेले अनेकजण मंत्रिपदासाठी ( Expansion of Cabinet ) इच्छुक आहेत. त्यापैकी १२ जण अस्वस्थ असून, ते आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते विनायक राऊत ( Shiv Sena leader Vinayak Raut ) यांनी केला. तसेच, हे औटघटकेचे सरकार आहे, अशी टीका केली.
मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मिळाला मुहूर्त : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत नेले. सुरतमध्ये जाऊन पक्षविरोधात बंड पुकारला. राज्यातील मविआचे सरकार अल्पमतात आल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. शिंदे यांनी भाजपच्या सोबतीने राज्यात सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची ३० जूनला शपथ घेतली. सरकारचा त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार लांबला. विरोधकांनी यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर कोटी करायला सुरुवात केली. अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय सरकारने घेतला आहे.