मुंबईशिवसंग्राम पक्षाचे नेते तथा माजी आमदार विनायक मेटे vinayak mete death यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. आज सकाळी पुणे-मुंबई महामार्गावर मेटे यांच्या वाहनाचा अपघात झाला. त्यानंतर जखमी मेटे who was vinayak mete यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला होता, त्याचे नेतृत्व केले होते. विनायक मेटे vinayak mete accident यांच्याबद्दल जाणून घेऊया.
हेही वाचा -Actor Armaan Kohli अभिनेता आरमान कोहलीची मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा जामिनासाठी धाव
विनायक मेटे हे बीड जिल्ह्यातील राजेगावचे रहिवासी होते. शिवसेना भाजप युतीत त्यांना विधान परिषदेवर संधी मिळाली होती. मेटे 3 जून 2016 साली बिनविरोध विधान परिषदेवर निवडून गेले होते. 2014 पर्यंत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य होते. 2014 विधानसभा निवडणुकीसाठी ते बीड मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होते, मात्र राष्ट्रवादीच्या जयदत्त शिरसागर यांनी त्यांच्या निवडणुकीत पराभव केला होता. माजी आमदार विनायक मेटे हे त्यांच्या आंदोलनामुळे ओळखले जातात. मराठा आरक्षण असो किंवा शिवस्मारक हे मुद्दे त्यांनी वेळोवेळी शासनापुढे उचलून धरले आहेत.